घरमुंबईऐ भरा ( लुटो )! साहेबांचा वाढदिवस,पेट्रोलवर ४ रूपयांची सुट!

ऐ भरा ( लुटो )! साहेबांचा वाढदिवस,पेट्रोलवर ४ रूपयांची सुट!

Subscribe

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त  मुंबईतील ३६ मतदारसंघामधील ३६ पेट्रोलपंपावर पेट्रोलवर चक्क ४ रूपयांची घसघशीत सुट मिळणार आहे. मनसेतर्फे या उपक्रमाचे आयोजन केले गेले आहे.

पेट्रोल १ पैशाने नाही तर ४ रूपयांनी स्वस्त! पण, साऱ्या देशात नाही तर केवळ मुंबईत! आता तुम्हाला प्रश्न पडला असेल देशातील सर्वात महाग पेट्रोल मुंबईत मिळत असताना अचानक ४ रूपयांनी स्वस्त होण्याचे कारण काय? सरकारला मुंबईकरांवर दया आली की कोणती निवडणूक लागली? थांबवा! तुमच्या मनात आलेल्या आनंदाच्या उफाळ्यांना थोडी मुरूड घाला आणि पेट्रोल ४ रूपयांनी स्वस्त होण्यामागील कारण जाणून घ्या. पेट्रोल ४ रूपयांनी स्वस्त होण्यामागे देखील खास कारण आहे. ते म्हणजे राज ठाकरेंचा वाढदिवस! होय, राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त  मुंबईतील ३६ मतदारसंघामधील ३६ पेट्रोलपंपावर पेट्रोलवर बाईकसाठी चक्क ४ रूपयांची घसघशीत सुट मिळणार आहे. मनसेतर्फे या उपक्रमाचे आयोजन केले गेले आहे.

कुठे-कुठे मिळणार पेट्रोलर ४ रूपयांची सुट!

मुंबईसह मुंबई उपनगरातील दादर येथीलगडकरी चौक पेट्रोलपंप, दादर येथील एच.पी. पेट्रोलपंप , वरळीनाका पेट्रोलपंप, रुईया महाविद्यालयासमोरील पेट्रोलपंप , शिवडी येथील मैत्री हॉटेल शेजारचा पेट्रोलपंप, भायखळा येथील विकी हॉटेल समोरील पेट्रोलपंप ,भारत पेट्रोलपंप,भाटीया रुग्णालय पेट्रोलपंप, ,मलबार हिल, भांडूप पश्चिम येथील  काळा पेट्रोलपंप, भारत पेट्रोलपंप आणि  मंगतराम पेट्रोलपंप, कलिना येथील कलिना ऑटोमोबाईल, कल्पना चित्रपटगृह, लालबहादूर शास्त्री मार्ग, नेहरु मार्ग पेट्रोलपंप, विलेपार्ले, डी.एन. नगर मेट्रो स्थानकाजवळील पेट्रोलपंप, अंधेरी ( प. )आदर्श नगर, ओशिवरा पेट्रोलपंप, आरे पेट्रोलपंप, गोरेगाव येथील  एस.व्ही. मार्ग,  एच.पी. साईकृपा पेट्रोलपंप – मालाड, दहिसर येथील इंडियन ऑईल पेट्रोलपंप, मुलुंडमधील छेडा पेट्रोलपंप, कांजुरमार्ग येथील गांधीनगर पेट्रोलपंप, अणुशक्तीनगर पेट्रोलपंप, वाशीनाका, नवजीवन पेट्रोलपंप, मुंबादेवी, कुलाबातील छगन मिठा पेट्रोलपंप, भारत पेट्रोलपंप,उल्हासनगर  मधील श्रीराम चौक, सीवूडमधील  हावरे मॉलसमोरील पेट्रोल पंप, सोलापूर पेट्रोलपंप, एच.पी. पेट्रोलपंप, शीव वर्तुळबेट, कुर्ला कमानी येथील जनसेवा पेट्रोल पंप  या पेट्रोलपंपावर पेट्रोलवर ४ रूपयांची घसघशीत सुट मिळणार आहे.

- Advertisement -

इंधन दरवाढीवरून राज ठाकरेंची टीका

पेट्रोल- डिझेलचे दर नव्वदीच्या जवळपास पोहोचल्यानंतर राज ठाकरेंनी सरकारवर टीकेची झोड उठवली. व्यंगचित्रांच्या मदतीने देखाील राज यांनी सरकारवर निशाणा साधला होता. कर्नाटक निवडुकीच्या निकालानंतर सलग १७ दिवस पेट्रोलच्या दरात वाढ होत गेली. परिणामी सामान्य जनता सरकारविरोधात आपला राग उघडपणे व्यक्त करू लागली. सामान्यांच्या समस्यांचा हाच धागा पकडत राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून थेट सरकारला लक्ष्य केले. राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला मुंबईकरांनी देखील भरभरून प्रतिसाद दिल्याचे पाहायाला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -