माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरण; सहा शिवसैनिकांची पुन्हा सुटका

मुंबईच्या बोरिवली कोर्टाने आरोपी सहा शिवसैनिकांचा जामीन मंजूर केला.

Mumbai's Borivali Court granted bail to all the six accused
माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरण; सहा शिवसैनिकांची पुन्हा सुटका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केल्यानंतर माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केली होती. ही घटना शुक्रवारी मुंबईतील कांदिवली पश्चिम येथे घडली. काल रात्री उशिरा याप्रकरणातील सहा आरोपी शिवसैनिकांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना आज कोर्टापुढे हजर केले. आता मुंबईच्या बोरिवली कोर्टाने याप्रकरणातील आरोपी सहा शिवसैनिकांनाचा जामीन मंजूर केला आहे.

मुंबईच्या बोरिवली कोर्टाने आरोपी सहा शिवसैनिकांचा प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. तसेच जेव्हा समन्स बजावले जाईल तेव्हा त्यांना पोलिसांसमोर हजर व्हावे लागेल, असे कोर्टाने सांगितले आहे, अशी माहिती आरोपींचे वकील कमलेश यादव यांनी दिली आहे.

 

नौदल अधिकाऱ्यांच्या मारहाणप्रकरणी १२ सप्टेंबरला एकूण सहा जणांना अटक करण्यात आली होती. पण त्यांची जामीनावर सुटका झाली होती. पण पुन्हा एकदा रात्री उशिरा या सहा जणांना अटक करण्यात आले आणि त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले. पण आता पुन्हा एकदा या सहा जणांची जामीनावर सुटका झाली आहे.

दरम्यान आज मारहाणी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर माजी नौदल अधिकारी दुपारी १२ वाजता राज्यपाल्यांच्या भेटीस गेले होते. राज्यपालांच्या भेटीनंतर त्यांनी आपण भाजप-आरएसएससोबत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, ‘आतापासून मी भाजप-आरएसएस सोबत आहे. जेव्हा मला मारहाण केले गेली, तेव्हा माझ्यावर मी भाजप-आरएसएस सोबत असल्याचा आरोप लावला होता. म्हणून मी आता भाजप-आरएसएस सोबत असल्याचे जाहीर करतो.’


हेही वाचा – दहशतवादी कसाबला ओळखणाऱ्या देवकीला हवीये आर्थिक मदत