घरमुंबईVideo: 'तो' एका मिनिटात ८० उलट्या उड्या मारतो; लक्ष्य गिनीज बुक ऑफ...

Video: ‘तो’ एका मिनिटात ८० उलट्या उड्या मारतो; लक्ष्य गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड

Subscribe

साकीनाका येथील नेताजी नगरमध्ये जेमतेम दहा बाय बाराच्या खोलीत राहणारा अकबर अली अन्सारी. आई-वडिल, भाऊ आणि दोन बहिणी असे अकबर अलीचे कुटुंब. मात्र दहा बाय बाराच्या खोलीत राहणारा आणि परिस्थिती बेताची असलेला अकबर अली अन्सारी आता तयारी करत आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची. तीही बॅक फ्लिप म्हणजेच (उलट्या उड्या) मारून अकबरला गिनिजमध्ये रेकॉर्ड करायचा आहे. एका मिनिटात ८० हून अधिक तो उलट्या मारतो. सगळ्यात महत्त्वाचे यामध्ये अकबर अलीला त्याच्या वडिलांची देखील तितकीच साथ मिळते. अकबरचे वडिल हे बासरी विक्रेते असून, ते आपल्या मुलाला मार्गदर्शन करत आहेत. वयाच्या चौथ्या वर्षांपासून अब्दुल बॅक फ्लिप( उलट्या उड्या) मारत असून, नुकताच त्याने वर्ल़्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचा किताब पटकावला आहे.

विविध डान्स शोमध्ये घेतला भाग

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अकबर अली याचा नुसताच बॅक फ्लिपमध्ये हातखंडा नसून, त्याला चांगल्या प्रकारे डान्सचे सर्व प्रकार येतात. एवढेच नाही तर त्याने डीआयडी लिटील मास्टर, डान्स प्लस. यासाह मराठीमधील डान्सच्या विविध रिअॅलिटी शोमध्ये देखील त्याने भाग घेतला आहे. मात्र टॉप १० मध्ये सहभाग न झाल्यामुळे आता तो बॅक फ्लिपमध्ये गिनिज बुक ऑफ वर्ल़्ड रेकॉर्ड मिळवण्याच्या तयारीला लागला आहे. विशेष बाब म्हणजे घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अकबर अली अन्सारीने घर खर्च आणि स्वत:चा खर्च निघावा यासाठी डान्सचा क्लासची शिकवणी देखील सुरू केली असून, तो चाळीस मुलांना आता डान्सचे धडे देत आहेत.

- Advertisement -

 

यांची मिळते अब्दुलला साथ

एकीकडे अकबर अली अन्सारी याला त्याचे वडिल पोटाला चिमटा काढून पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करत असताना त्याला आता बाहेरून देखील मदतीचा हात मिळू लागला आहे. त्याच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेक़ॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी वर्ल्ड रेकॅर्ड इंडियाचे अध्यक्ष प्रविण सोलंकी, समन्वयक सुषमा तांबडकर आणि संजय नार्वेकर हे मदत करत असून, यासाठी ते त्याला सर्वोतोपरी मदत करत आहेत.

मी वयाच्या चौथ्या वर्षांपासून मेहनत घेत आहे. मी काही तरी करून दाखवावे हे माझ्या वडिलांचे स्वप्न आहे. त्यासाठी ते माझ्याकडून मेहनत करून घेत आहेत. आधी मी ४० बॅक फ्लिप मारत असे मात्र आता वडिलांनी माझ्याकडून करून घेतलेल्या मेहनतीमुळे मी आता मिनिटाला ८० बॅक फ्लिप मारतो. – अकबर अली अन्सारी

अकबर हा गरीब घरातील असून, त्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची हिंमत आहे. फक्त त्याच्या कला गुणांना वाव मिळावा आणि त्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी आम्ही देखील त्याला सर्वोतोपरी मदत करत आहोत. एका गरीब कुटुंबातील मुलाला सपोर्ट मिळाला तर तो नक्कीच पुढे जाईल. – सुषमा तांबडकर, रेकॉर्ड समन्वयक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -