घरमुंबईमुंबईतील उत्तर भारतीय मतदानापासून वंचित?

मुंबईतील उत्तर भारतीय मतदानापासून वंचित?

Subscribe

२३ ते २९ एप्रिल दरम्यान दीड लाखांहून अधिक तिकिटांचे आरक्षण रद्द

निवडणुकीत मतदानाचा हक्क बजविण्यासाठी मुंबईतील लाखो उत्तर भारतीय गावाकडे निघण्याची तयारी करत आहेत. मात्र, ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत लोकसभा निवडणूक आल्यामुळे उत्तर भारतात जाणार्‍या सर्वच रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील अनेक उत्तर भारतीयांना मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे. त्याकरिता मध्य आणि पश्चिम रेल्वेने उत्तर भारतात जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालवाव्यात, अशी मागणी रेल प्रवासी संघटना आणि उत्तर भारतीय संघटना यांनी केली आहे.

मुंबईहून उत्तर भारतात जाणार्‍या रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उत्तर भारतात जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्यांची २३ ते २९ एप्रिल दरम्यान आरक्षित झालेल्या ११ लाखांहून अधिक तिकिटांपैकी तब्बल १ लाख ८९ हजार ८४३ आरक्षणे रद्द करण्यात आली आहेत. कारण ती सर्व तिकीटे प्रतीक्षा यादीतील होती. याचा अर्थ या प्रवाशांनी त्यांचे प्रवासाचे नियोजन रद्द केले आहे. त्याचा परिणाम म्हणून या हजारो उत्तर भारतीयांना लोकसभा निवडणुकीतील मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे.

- Advertisement -

ही सर्व आरक्षणे गोरखपूर एक्स्प्रेस, मुंबई ते वाराणसी एक्स्प्रेस, तिरुअनंतपूरम, हिमसागर एक्स्प्रेस, निजामुद्दीन-नवी दिल्ली आणि जम्मू तावी हावडा एक्स्प्रेस, अहमदाबाद, रायपूर, हावडा, गुवाहाटी एक्स्प्रेस, पटना आणि गुवाहाटी अशा अनेक एक्स्प्रेस गाड्यांची होती. आरक्षण तिकीट आरक्षित करण्यात आले आहे. २३ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान बिहार आणि उत्तर प्रदेशचे तिसरे आणि चौथ्या टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. या मतदानासाठी गावी जाऊन आपल्या विभागात मतदान करता यावे यासाठी मुंबईत राहणार्‍या उत्तर भारतीय नागरिकांनी रेल्वे गाड्यांचा आधार घेतला होता.

मुंबईहून दिल्ली, पंजाबसह अन्य हिंदी भाषिक राज्यांत जाणार्‍या एकूण 97 रेल्वेगाड्या आहेत. तसेच, परराज्यांतून मुंबईमार्गे जाणार्‍या गाड्यांची संख्याही अधिक आहे. नियमित गाड्यांसह उन्हाळी सुट्ट्यांच्या विशेष गाड्यांची तिकिटे आरक्षित झाली आहेत. त्यामुळे उत्तर भारतीयांना मतदानासाठी गावाकडे जाण्याकरिता अडचणी निर्माण झाल्या आहेत.

- Advertisement -

रद्द झालेली आरक्षणे
२३ एप्रिल – २९ हजार ७०७
२४ एप्रिल – १७ हजार ४०४
२५ एप्रिल – ३१ हजार ८१४
२६ एप्रिल – २८ हजार ८११
२७ एप्रिल – २७ हजार ९८३
२८ एप्रिल – २७ हजार ३४६
२९ एप्रिल – २६ हजार ७७८
एकूण – १ लाख ८९ हजार ८४३

मुंबईत भाजप-काँग्रेसला बसणार फटका
मुंबईतील लाखो उत्तर भारतीय उन्हाळ्याच्या सुट्टीत लोकसभा निवडणुकीत आपले मतदान करण्यासाठी गावी जाणार असल्याने त्याचा फटका महाराष्ट्रात काँग्रेससह भाजपला बसण्याची शक्यता आहे. कारण मुंबईत राहणारे असंख्य उत्तर भारतीय हे मागील कित्येक वर्षांपासून मुंबईत वास्तवाला आहेत. त्यामुळे त्यांनी मुंबईतही मतदान अधिकार मिळवले आहेत.

लोकसभा निवडणूक आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे मुंबईतील लाखो उत्तर भारतीय गावाकडे जाणार आहेत. त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात 11 लाखांहून अधिक तिकिटे आरक्षित झाली आहेत. त्यातील दीड लाखांहून अधिक तिकिटे रद्द झाली आहेत. निवडणुकीचा हक्क बजावण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाड्या सोडाव्यात किंवा पर्यायी व्यवस्था करावी. – सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -