मुंबईकरांचा रविवार प्रवास खडतर

Mumbai
railway

मध्य रेल्वेच्या मार्गावरील दुरुस्ती कामांसाठी हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आपला रविवार नियोजन करूनच घराबाहेर पडाव लागणार आहे. मात्र पश्चिम मार्गावर आणि मध्य मार्गावर मेगा ब्लॉक असणार नाही.

हार्बर प्रवास अडखळतच

’ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे डाऊन हार्बर सेवा सकाळी ११.४० पासून ते दुपारी ४.१० पर्यंत लोकल वाहतूक सेवा बंद राहील. चुनाभट्टी आणि वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत बंद राहील.

’ सकाळी ११.३४ पासून सायंकाळी ४.२३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, वडाळा रोड ते वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणार्‍या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल गाडयाही रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.१६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वांद्रे, गोरेगावसाठी सुटणार्‍या डाऊन हार्बर लोकल गाडया बंद राहतील.

’ सकाळी ९.५३ ते दुपारी २.४४ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला येणार्‍या पनवेल, बेलापूर वाशीहून सुटणार्‍या अप हार्बर मार्गावरील गाडया रद्द करण्यात आल्या आहेत.

’ त्याचबरोबर सकाळी १०.४५ पासून सायंकाळी ४.५८ पर्यंत छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबईला येणार्‍या गोरेगाव आणि वांद्रेहून येणार्‍या अप हार्बर मार्गावरील गाडयाही रद्द करण्यात आल्या आहे.

’ ब्लॉकच्या दरम्यान पनवेल आणि कुर्ला स्थानकातून विशेष गाडया प्लॅटफॉर्म क्रमांक आठवरून सोडण्यात येतील.

’ हार्बर लाइनच्या प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here