घरताज्या घडामोडीCoronavirus: मुंबईकरांनो 'जनता कर्फ्यु'त सामील व्हा; पालिका आयुक्तांचे आवाहन

Coronavirus: मुंबईकरांनो ‘जनता कर्फ्यु’त सामील व्हा; पालिका आयुक्तांचे आवाहन

Subscribe

करोनाशी लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया - प्रवीणसिंह परदेशी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केले आहे. या ‘जनता कर्फ्यू’मध्ये मुंबईकरांनी सामील व्हावे, असे आवाहन मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी केले आहे. करोनाची साथ रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून सर्वांनी घरीच राहण्याचा संकल्प करावा, असे परदेशी म्हणाले.


हेही वाचा – Coronavirus: ‘नागपुकरांनो ऐकलं नाही तर बळजबरीनं घरी बसाववं लागेल’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार उद्या सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्युत सर्व मुंबईकरांनी सामील होऊन करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मदत करावी. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून खाजगी कार्यालये आणि दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिकेचे अत्यावश्यक सेवेसाठी असलेले कर्मचारी आपली जबाबदारी पार करत असून आपण सर्वांनी एकत्र येऊन करोनाला हरवूया. घरी क्वारंटाईन केलेले रुग्ण हे बाहेर फिरत असून ते मुंबईकरांच्या आणि आपल्या नातेवाइकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत. अशा रुग्णांना १४ दिवस सक्तीने घरीच ठेवले जाईल. जर कोणी रुग्ण बाहेर आढळला तर त्याच्यावर गंभीर कारवाई करण्यात येईल. मुंबई लॉकडाऊन केल्यामुळे खाजगी कंपन्यांनी सरकारला आणि महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन प्रवीणसिंह परदेशी यांनी केले आहे.

- Advertisement -

सध्या राज्यात करोनाचा प्रदुर्भाव वेगाने होत आहे. राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ६४वर पोहोचली आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा, दुकाने, सरकारी तसेच खासगी कार्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -