घरमुंबईक्रीडा संकुलातील गवत उपटून काढा, नाहीतर त्याचा बुके देऊ; मनसेचा हल्लाबोल्ल

क्रीडा संकुलातील गवत उपटून काढा, नाहीतर त्याचा बुके देऊ; मनसेचा हल्लाबोल्ल

Subscribe

डोंबिवली क्रीडा संकुलातील जॉगिंग ट्रकवर गवत आणि झुडपे मोठया प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र त्याकडे पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही त्यांच्याकडून कानाडोळा केल्याने मनसे आक्रमक झाली आहे. दोन दिवसात गवत आणि झाडे झुडपे न काढल्यास पालिका अधिकाऱ्यांना त्याच गवताचा बुके देऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी

महापालिकेचे हभप सावळाराम महाराज हे एकमेव भव्य क्रिडा संकुल आहे. संकुलातील सुविधांअभावी मुलांना अनेक अडचणी येत असतात. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी या हेतूने क्रीडा संकुल खुले करण्यात आले आहे. क्रीडा संकुलावर फुटबॉल, बॅडमिंटन, स्विमींग, अॅथलेटिक्स आदी क्रीडाप्रकार सुरू आहेत. अनेक खेळाडू हे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर डोंबिवलीचे नेतृत्व करीत आहेत. मात्र अपुऱ्या सुविधांचा त्रास खेळाडूंना होत आहे. क्रीडा संकुलात जॉगिंग ट्रक असल्याने सकाळच्यावेळी क्रीडा संकुलात खूपच गर्दी असते. मात्र जॉगिंग ट्रक व मैदानाच्या आजूबाजूला प्रचंड गवत व झुडपे वाढली आहेत. त्यामुळे त्याचाही त्रास खेळाडूंना सहन करावा लागतो मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र अजूनही झुडप, गवत कापण्यात आलेले नाही.

- Advertisement -

मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांचा आंदोलनाचा इशारा

दोन दिवसांपूर्वीच कल्याण वसंत व्हॅली येथील स्व.हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बस डेपो येथे वाढलेले गवत, झुडपे खुरटी झाडे पालिकेने त्वरीत कापून डेपो स्वच्छ केला. मग क्रीडा संकुलात स्वच्छ करण्यास कानाडोळा का केला जातोय? असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेच्या वास्तु, मालमत्ता, खेळाची मैदाने ह्यांची निगा राखावी आणि करदात्या नागरिकांच्या कर रुपी पैशांचे नाहक होणारे नुकसान टाळावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कदम यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -