घरमुंबईमध्य-पश्चिम रेल्वेने थकवले पालिकेचे 527 कोटींचे पाणी बिल

मध्य-पश्चिम रेल्वेने थकवले पालिकेचे 527 कोटींचे पाणी बिल

Subscribe

पालिका रेल्वेवर मेहरबान, तीन वर्षांपासून 527 कोटींची थकबाकी

मुंबईची लाईफलाईन असलेल्या उपनगरातील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर पालिकेकडून पाणीमध्य-पश्चिम रेल्वे प्रशासनाने बृहन्मुंबई महानगर पालिकांचे 527 कोटी रुपयांचे पाण्याचे बिले गेल्या तीन वर्षांपासून थकवले आहे. पुरवठा केला जातो.आरटीआय कार्यकर्ते समीर झवेरी यांनी पालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांच्या मागावलेल्या माहितीतून ही बाब उघडकीस आली आहे. 2017 पासून मध्य रेल्वेचे 238 कोटी रुपये आणि पश्चिम रेल्वेकडे 289 असे एकूण 527 कोटी रुपयांचे पाण्याची थकबाकी रक्कम आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकांडून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच पाण्याची थकबाकी रक्कम वसूल करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुध्दा करण्यात आले नाही. मात्र सामान्य मुंबईकराने जर दोन ते तीन महिन्यात जास्त पाण्याची थकबाकी ठेवली तर पालिका आपली जलजोडणी खंडित करते. परंतु, पालिका प्रशासन रेल्वे विभागावर काहीशी मेहरबान दिसन येत आहे.

मध्य-पश्चिम रेल्वे प्रशासनाने बृहन्मुंबई महानगर पालिकांचे 527 कोटी रुपयांचे पाण्याचे बिले गेल्या तीन वर्षांपासून थकवले आहे. पालिका प्रशासनांकडून रेल्वे प्रशासनाला नोटीस बजावून रेल्वेवर कारवाई करण्यात आलेली नाही. सामान्य मुंबईकराने जर दोन ते तीन महिन्यात जास्त पाण्याची थकबाकी ठेवली तर पालिका आपली जलजोडणी खंडित करते. त्यामुळे बृहन्मुंबई महानगर पालिकांकडून कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

- Advertisement -

पालिकाकडून गेल्या तीन वर्षांपासून रेल्वेचे पाण्याचे थकीत बील का वसूल करण्यात आलेली नाही. त्यांच्यावर कायदेशीर नोटीस बजावून सुध्दा कारवाई करण्याऐवजी त्यांना पाणी पुरवठा केला जात आहे हे निराशाजनक असून सामान्य मुंबईकराने जर दोन महिन्यात जास्त पाण्याची थकबाकी ठेवली तर पालिका आपली जलजोडणी खंडित करते. त्यामुळे पालिका प्रशासनाने रेल्वेवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया आरटीआय कार्यकर्ते समीर झवेरी यांनी दिली.


हेही वाचा – महापालिकेच्या १० शाळांमध्ये सुरू होणार सीबीएसई बोर्ड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -