घरमुंबईपालिकेच्या शिक्षण सेवकांवर टांगती तलवार

पालिकेच्या शिक्षण सेवकांवर टांगती तलवार

Subscribe

राज्य शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टेट) उत्तीर्ण असणे ही अट बंधनकारक केली आहे. मात्र मुंबई महापालिकेअंतर्गत अनेक शिक्षकांनी या टेट परीक्षेची अट पूर्ण केलेली नाही, त्यामुळे आता या शिक्षकांसमोर नवी अडचण निर्माण झाली असून ही परीक्षेची पूर्ण करण्याची अखेरची संधी त्यांना पालिका प्रशासनाने दिली आहे.

राज्य शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टेट) उत्तीर्ण असणे ही अट बंधनकारक केली आहे. मात्र मुंबई महापालिकेअंतर्गत अनेक शिक्षकांनी या टेट परीक्षेची अट पूर्ण केलेली नाही, त्यामुळे आता या शिक्षकांसमोर नवी अडचण निर्माण झाली असून ही परीक्षेची पूर्ण करण्याची अखेरची संधी त्यांना पालिका प्रशासनाने दिली आहे. यासंदर्भात पालिका शिक्षण विभागाने नवे परिपत्रक जाहीर केले असून या पत्रकाने या शिक्षकांची झोप उडविली आहे. या परिपत्रकानुसार या शिक्षकांना येत्या फेब्रुवारीपर्यंत ही परीक्षा पूर्ण करण्याची अखेरची संधी असणार आहे. त्यामुळे आता मुंबईत कार्यरत असलेल्या अनेक शिक्षक सेवकांच्या कामावर टांगती तलवार लटकत आहे. त्यामुळे आता शिक्षण सेवकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्य शिक्षण विभागाने काही वर्षांपूर्वी शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक केली आहे. त्यानुसार सर्व शिक्षकांना ही परीक्षा बंधनकारक आहेत. मात्र पालिकेत १३ फ्रेबुवारी २०१३ नंतर नियुक्त करण्यात आलेल्या अनेक शिक्षकांनी ही परीक्षा दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या शिक्षकांना २०१६ पासून ही परीक्षा उत्तीर्ण करण्याची संधी देण्यात आलेली आहे. वेळोवेळी संधी देऊनही या शिक्षकांनी अद्याप या परीक्षेची अट पूर्ण न केल्याने आता पालिका शिक्षण विभागाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. पालिका शिक्षण विभागातर्फे या संदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात आले. या परिपत्रकानुसार आता या शिक्षकांना ३० फेब्रुवारी २०१९ पर्यंत ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे.

- Advertisement -

पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी हे परिपत्रक जाहीर केले आहे. तर या दिलेल्या मुदतीनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत या परिपत्रकात नमूद केले आहे. त्याचबरोबर शिक्षणाधिकार्‍यांनी सर्व उपशिक्षणाधिकार्‍यांना यासंदर्भातील त्यांच्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना यासंदर्भाची माहिती देण्याचेही जाहीर केले आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या २५० ते ३०० शिक्षकांनी ही परीक्षा दिलेली नसल्याची माहिती ही यानिमित्ताने समोर आली आहे. त्यामुळे या सर्व शिक्षकांना आता ही परीक्षा देण्यासाठी अखेरची संधी असणार आहे. त्यानंतर त्यांना कामावरुन काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांकडून देण्यात आली. या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य शासन परिपत्रकान्वये प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा ही देणे बंधनकारक केलेली असल्याचे स्पष्ट केलेले आहे.

याबद्दल आपलं महानगरशी बोलताना शिक्षणाधिकारी महेश पालकर म्हणाले की, शिक्षकांनी टेट परीक्षा उत्तीर्ण असणे हे बंधनकारक असणार आहे. २०१६ पासून आपण या शिक्षक सेवकांना वेळोवेळी संधी दिलेली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारच्या निर्णयानुसार करण्यात येत आहेत. त्यामुळे आता या शिक्षकांना अखेरची संधी असणार असून त्यांनी त्वरीत त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी दिले. तर याबद्दल बोलताना मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे प्रशांत रेडीज म्हणाले की, शिक्षकांनी टेट परीक्षा उत्तीर्ण असणे यात काही शंका नाही. पण ज्यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांच्यासाठी याची जबरदस्ती का? आज या परीक्षेचा निकाल पाहिला तर ही परीक्षा किती कठीण आहे, हे आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे या सेवकांना संधी देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -