घरमनोरंजनज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

Subscribe

राज्य सरकारने यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण यांना जाहीर केला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त या पुरस्काराची घोषणा केली जाते.

राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा २०१७-१८ चा पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ राम-लक्ष्मण यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टद्वारे याची माहिती दिली. आज भारतरत्न लता मंगेशकर यांचा ८९ वा वाढदिवस आहे. दरवर्षी या दिवसाचे औचित्य साधून शासनातर्फे लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा केली जाते. या पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे असणार आहे.

- Advertisement -

हिंदी, मराठी तसेच भोजपूरी चित्रपटांना संगीतबद्ध केले 

विजय पाटील उर्फ रामलक्ष्मण हे भारतीय संगीतकार आणि चित्रपट संगीत दिग्दर्शन क्षेत्रातील मोठ नाव आहे. १९७६ पर्यंत राम कदम आणि विजय पाटील हे राम लक्ष्मण या नावाने संगीत देत होते. १९७६ साली राम कदम यांच्या निधनानंतर पाटील यांनी पुढेही राम लक्ष्मण हेच नाव वापरण सुरू ठेवलं. या ज्येष्ठ संगीतकाराने बॉलीवूडमधील काही हिट चित्रपटांना संगीत दिले आहे. १९८९ साली आलेल्या मैने प्यार किया चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय पत्थर के फूल, हम आपके है कौन, हम साथ साथ है यासारख्या अनेक चित्रपटांच्या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. त्यांनी आजवर ७५ हून अधिक हिंदी, मराठी आणि भोजपूरी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -