माझेही मत …

Mumbai
Election

विचारपूर्वक मताधिकार बजवावा

लोकशाही टिकविण्यासाठी निवडणूक ही एक महत्वपूर्ण प्रक्रिया आहे. आजही निवडणूक, मताधिकाराच्या बाबतीत नागरिकांमध्ये जागरूकतेचा अभाव आढळतो. नागरिकांनी मत देणे हे दान नसून त्यांचा अधिकार असल्याचे लक्षात घेतले पाहिजे. निवडणुकीत मताधिकार बजावताना नागरिकांनी त्यांच्या मतदार संघातील उमेदवारांची सर्व माहिती करून घेणे गरजेचे आहे. उमेदवाराचे शिक्षण, सामाजिक प्रश्नांची उमेदवाराला असलेली जाण तसेच त्याने निवडणुकीत सादर केलेले घोषणापत्र आदी गोष्टींचा बारकाईने विचार करूनच नागरिकांनी मताधिकार बजावावा. -वर्षा विद्या विलास,सदस्य, नशा मुक्ती संघटना

मतदानापूर्वी विचार करा

आता निवडणूक अगदीच जवळ आली आहे. त्यामुळे अगदी गाड्यांमधून प्रवास करण्यापासून ते गल्लीबोळात फिरण्यापर्यंत सर्वच प्रकार नेते करताना दिसत आहेत. पण निवडून आल्यानंतर पाच वर्षात तुम्हाला कधी हे नेतामंडळी दिसतात का? याचे उत्तर नक्कीच सगळ्यांचे एकच असेल ते म्हणजे नाही. त्यामुळे सध्या जी गडबड चालू आहे ती फक्त आणि फक्त मत मिळवण्यासाठी. यानंतर पुन्हा पाच वर्ष हे सगळे नेते नक्कीच गायब असतील. त्यामुळे तुम्हाला ज्यांना मत द्यायचे असेल त्याला नीट विचार करूनच मत द्या.-नेहा कदम, विद्यार्थिनी

मतदार संभ्रमात

नक्की कोणासाठी आहेत हे नेते? स्वतःसाठी फक्त जगतात. यांना जनतेचे काहीही देणेघेणे नसते. फक्त निवडणुकांच्या वेळी यांना आपली मतदारांची आठवण होत असते. आता आचारसंहिता लागू होईपर्यंत ही सर्व नाटके चालू राहतील आणि पुन्हा होती तीच अवस्था दिसून येईल. रस्त्यावर एकही नेता दिसणार नाही. तीच रस्त्यांची घाणेरडी अवस्था आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या हेच चित्र असेल. यांच्यावर अजिबात भरवसा करता येणे शक्य नाही आहे. पण मत तरी का फुकट घालवा असाही विचार असतो. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था आहे.-– विनोद खामकर, व्यावसायिक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here