घरमुंबई'जनतेनं मला भरभरून दिलं'; शरद पवारांचे भावनिक ट्विट

‘जनतेनं मला भरभरून दिलं’; शरद पवारांचे भावनिक ट्विट

Subscribe

'अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे.'

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणाऱ्या शरद पवारांनी राज्यभरात दौरा सुरू केला असून या दौऱ्याला तरूण मंडळीकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जालना येथे जाहीरसभा घेतल्यानंतर शरद पवारांनी भावनिक ट्विट केलं. महाराष्ट्राने मला भरभरून दिलं. माझी आता कोणतीही इच्छा नाही. जनतेने मला चार वेळा मुख्यमंत्री केलं, देशाचा संरक्षण मंत्री केलं, १० वर्षे कृषीमंत्री केलं. जनतेने मला भरभरून दिलं आहे. आता मला आणखी काही नको. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे, असे या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

शरद पवार यांनी मागील चार दिवसांपुर्वी सोलापूर येथून सुरू केलेल्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आणि उत्साह पाहून तेथील दौऱ्यादरम्यान, पवार यांनी हे भावनिक ट्विट केले आहे.

- Advertisement -

तसेच, या वयात तुम्ही का फिरता असे मला म्हणतात. पण माझे काही वय झालेले नाही. नवी पिढी, शेतकरी, कामगार, भटके, अल्पसंख्याक, महिला, दलित, आदिवासींना पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्र व देशाला पुढे नेण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यासाठी कष्ट करणे गरजेचे आहे. तेच कष्ट मी करतो आहे, असे देखील ट्विट करत शरद पवारांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -