घरताज्या घडामोडीनवी मुंबई महापालिकेत आता नाईक नसतील - अजित पवार

नवी मुंबई महापालिकेत आता नाईक नसतील – अजित पवार

Subscribe

नवी मुंबई महानगर पालिकेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवत असल्यामुळे काही जणांना तिकीट भेटणार नाही. मात्र बेरजेचे राजकारण करायचे असल्यामुळे कुणी रुसवा-फुगवा ठेवू नका. यावेळी कुणीही महापौर होईल, पण तो नाईक नसेल, अशी रोखठोक भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीने मंगळवारी वाशी येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केला. कोणत्याही परिस्थितीत महापालिका जिंकायची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आजपासूनच जोमाने कामाला लागा, अशा शब्दात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. दरम्यान, महापालिका निवडणुकीत विरोधी पक्षांचे नगरसेवक महाविकास आघाडीत येण्याची शक्यता वर्तवित नवी मुंबई भाजपला खिंडार पडण्याचे सूतोवाच आजच्या सभेत आघाडीच्या नेत्यांनी मांडले.

नवी मुंबई महानगर पालिकेत काही जणांची मक्तेदारी होती. त्यांना घाबरायचे कारण नाही. ज्या गावच्या बाभळी असतात, त्या गावात बोरी देखील असतात. आम्ही तिघे एकत्र आल्यामुळे सोम्या गोम्याने गडबड करु नये. अरे ला कारे करण्याची हिंमत महाविकास आघाडीतील तिनही पक्षात आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबईत महापालिकेतील सत्ताधारी आणि भाजपवर टीका केली.

- Advertisement -

लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नवीन निर्णय केंद्र सरकार घेते. मात्र त्यातून देशात नवीन प्रश्न निर्माण झाले. हे देशासाठी घातक आहे. भाजपचे हे धोरण देशासाठी घातक आहे, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात राहणाऱ्या कोणत्याही घटकाला आपलेसे वाटावे अशी धोरणे राबविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आज अनेक प्रश्न रखडलेले आहेत. मात्र ,शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजयांचा आदर्श घेऊन पुढे जाणारे हे सरकार आहे. त्यामुळे विकासात पाहू अडचणी येणार नाही, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. मात्र ,त्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर मार्केट इतके पडले कि चार लाख कोटी रुपये बुडाले. आज CAA आणि NRC विरोधात आणि समर्थानात आंदोलने सुरु आहेत. मात्र, राज्याची कायदा व्यवस्था आबादित ठेवण्याची महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची जबाबदारी असल्याचे कार्यकर्त्यांना सूचित केले प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव घरांचा प्रश्न, सिडको क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न, नवी मुंबई झोपडपट्टी पुनर्वसचा प्रश्न, वाहनतळाची प्रश्न, एमआयडीसीचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देतानाच यापुढे नवी मुंबईत अनधिकृत बांधकामे होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले. एप्रिल मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्रस्तापित नाईक महापालिकेत सत्तेत नसतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त करीत तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम कण्याचा सल्ला दिला.

- Advertisement -

शिवसेनेने भरभरून दिले मात्र शिवसेनेच्या पोटात खंजीर खूपसले. राष्ट्रवादीने देखील भरभरून दिले मात्र त्यांच्याही पाठीत खंजीर खुपसले, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणार्यांना नवी मुंबईची जनता नक्कीच जागा दाखवेल, असा घणाघात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.राज्याबरोबर नवी मुंबईत देखील महाविकास आघाडीची सत्ता येईल असा विश्वास देखील त्यांनाही व्यक्त केला. राज्यात महाविकस आघाईचे सरकार जोमाने काम करत असून राज्याच्या आणि नवी मुंबईच्या विकासातही आर्थिक निधी कमी पडू देणार नाही, असे देखील ते म्हणाले. नवी मुंबईच्या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला. नवी मुंबईचे प्रश्न जाणीवपूर्व येथील महापालिकेतील सत्ताधारी यांनी रखडून ठेवले, अशा शब्दात आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका केली.

अजून देखील सत्तेचे स्वप्न पडणाऱ्या भाजपला त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. राजकारणात अगदी खालच्या थराला भाजपचे राजकारण सुरु आहे. यांचं काही जमणार नाही , यांच्याकडे फक्त १३० आमदार आहेत, यांची काही सत्ता येणार नाही, अशी महाविकास आघाडीला नावे ठेवणाऱ्यांची सरकार स्थापनेनंतर बोलती बंद झाली, असा टोला भाजपाचे नेते नारायण राणे यांचे नाव न घेता लगावला. महाराष्ट्राला बुलेट ट्रेन नको तर आमची लोकल ट्रेन बरी, असा टोला केंद्र सरकारला लगावला.

वाशी येथे संपन्न झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ठाणे जिल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री, अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -