घरमुंबईनालासोपार्‍यात शिट्टीच वाजणार!

नालासोपार्‍यात शिट्टीच वाजणार!

Subscribe

निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रचारसभा, चौकसभा, मतदारांच्या भेटीगाठी आणि अभिनेते गोविंदा आणि भाऊ कदम, श्रेया बुगडे या सिनेअभिनेत्यांच्या रोड शोतून बहुजन विकास आघाडीने प्रचार केला. त्याला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे चित्र होते.

नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी सन 2001 ला वसई येथील वर्तक महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून प्राविण्य प्राप्त केले. सन 2004 ला अमेरिका येथील बाल्डविन वॅलेस विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापन (बिझनेस मॅनेजमेंट), 2008 ला मुंबई विद्यापीठाची ‘व्यवसाय प्रशासन’ (बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) ची पदवी प्राप्त केली, 2010 ला हार्वर्ड विद्यापीठ-अमेरिका येथून ’स्थावर मालमत्ता व्यवस्थापन’( रिअल इस्टेट मॅनेजमेंट ) आणि प्रेसिडेंट मॅनेजमेंट प्रोग्राम हे अभ्यासक्रम पूर्ण केले. सध्या ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी (डॉक्टरेट) चे शिक्षण पूर्ण करत आहेत. अशा उच्च शिक्षित उमेदवाराची लोकप्रतिनिधी म्हणून गरज आहे असे स्पष्ट करून शहीद साळसकर यांच्या कन्येने क्षितिज ठाकूर यांना जाहीर समर्थन दिले आहे.

- Advertisement -

शहरास आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा, सुनियोजित वाहतूक सेवा, शिक्षण, आरोग्यसेवा आणि महिला सबलीकरण या मुद्द्यांवर बविआचे भविष्यात लक्ष असेल, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय वसईत उद्योगधंद्यांना चालना देऊन येथील युवकांना रोजगारनिर्मिती करून देणे हे आमचे ध्येय असेल असे बविआ उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी येथील जनतेचा आशीर्वाद घेताना वचन दिले. वसई मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांची लोकांमध्ये ‘आपला आप्पा’ अशी आपुलकीची ओळख आहे. निवडणूक पूर्व दोन दिवस शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस असल्याने बविआचे कार्यकर्ते या दोन दिवसात प्रचारात अधिक आक्रमक होतील, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -