घरमुंबईनालासोपारा आंदोलन चिघळले; पोलिसांचा जमावावर लाठीचार्ज

नालासोपारा आंदोलन चिघळले; पोलिसांचा जमावावर लाठीचार्ज

Subscribe

नालासोपारा स्थानकातील रेलरोको आंदोलन चिघळले असून नाईलाजास्तव गर्दीला पांगवण्यासाठी स्थानिक पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे.

नालासोपारा स्थानकातील रेलरोको आंदोलन चिघळले असून नाईलाजास्तव गर्दीला पांगवण्यासाठी स्थानिक पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. आक्रमक आंदोलनकर्ते, प्रवासी यांची पोलिसांसोबत बाचाबाची झालू असून आधी त्यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तसेच बाटल्याही फेकण्यात आल्या. या दगडफेकी एक पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला दगड लागल्याने ते जखमी झाले असून त्यांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अखेर पोलिसांनी संतप्त जमावावर बचावासाठी लाठीचार्ज केला. या आंदोलनाचा फटका जवानांनाही बसला असून सांताक्रूझ येथून बोईसरला जाणारे ३ ते ४ जवान रेलरोकोमुळे नालासोपारा स्थानकात अडकून पडले आहेत. विरारहून त्यांना बोईसर येथील तारापूरला ट्रेनिंगकरता जायचे आहे.

- Advertisement -

प्रवाशांना घरी जाण्याच्या सूचना 

दरम्यान, आंदोलन सुरु झाल्यानंतर काही तासांनी नालासोपारा येथील फलाट क्र. ३ आणि ४ वरून अनुक्रमे चर्चगेट आणि विरारला जाणारी पहिली लोकल सोडण्यात आली. मात्र त्यांनतर पुन्हा आंदोलन भडकल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना घरी जाण्याचे आवाहन केले. कोणतीच गाडी सुटणार नाही, अशी घोषणा तेथे रेल्वेकडून करण्यात आली.

जागोजागी बंदची हाक 

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आजही मुंबईसह देशभरात बंदची हाक देण्यात आली आहे. नलासोपारा येथे दुकान बंद ठेवण्यात आली असून काहींनी आपल्या दुकानासमोर मेणबत्त्या लावत शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशाच नालासोपाऱ्यातील एक दुकानदार प्रज्ञा शर्मा यांनी आपल्या दुकानासमोर मेणबत्या लावल्या आहेत. प्रज्ञा यांचा भाऊ जवान आहे. ज्या बसवर हल्ला झाला त्याच्या मागच्या बसमध्ये त्यांचा भाऊ होता. मात्र तो सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले. नालासोपारातील या बंदमध्ये दुकानं, रिक्षा, बस यांचाही समावेश आहे. दरम्यान, भाईंदर, वसई, विक्रोळ, कल्याण, चेंबूर या ठिकाणी बंद पाळण्यात आला आहे. तर भाईंदर रेल्वे स्थानकावरही आंदोलन करण्यात आले. नालासोपाऱ्यात टायर जाळून रास्तारोको करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -