‘या’ फोटोनं मांडलं कोरोनाचं भीषण वास्तव!

नालासोपारा पूर्व येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

Mumbai
तिरडी टॅक्सीच्या टपावरून नेण्यात आली

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  सगळेच चिंतेत आहेत. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. अद्याप कोरोनाला हरवण्यात यश आलेलं नाही. यात सगळ्या वातावरणात समोर आलेल्या एका फोटोमुळे सगळ्यांचं मन अस्वस्थ झालं आहे. नालासोपाऱ्यातील हे विदारक चित्र मन हेलावून टाकतं.

रविवारी नालासोपाऱ्यात राहणाऱ्या एका इसमाचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेची कोरोना महामारीत सुरू असलेली लूट आणि कुटुंबीयांकडे पैशाची असलेली कमतरता, याचा विचार करून थेट एका टॅक्सीच्या टपावर तिरडी बांधून त्यावर मृतदेह ठेवून स्मशानभूमीत नेण्यात आला. म्हणजेच मरणानंतरही या व्यक्तीच्या मरणयातना संपल्या नाहीत.

नालासोपारा पूर्व येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. घरातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबातील व्यक्तींनी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला, मात्र रूग्णवाहिकेने अव्वाच्या सव्वा पैसे मागितल्यामुळे नकार दिला. त्यामुळे आता मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणारी अडचण आली. मग कुटुंबियांनी तुळींज येथील स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी एका टॅक्सीचा आधार घेतला. कुटुंबियांनी टॅक्सीच्यावर तिरडी बांधण्यात आली आणि पूर्वेकडील तुळींज, टाकीरोड मार्गावरून स्मशानभूमीत नेण्यात आले.

कोरोनामुळे मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. लॉकडाऊनचा  व्यवसायावर झालेला परिणाम , रुग्णवाहिकेकडून होणारी हे एका फोटोतून समोरं येतं.


हे ही वाचा – काय नशीब आहे राव! काम करताना सापडली अशी वस्तू ज्यामुळे झाला कोट्याधीश!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here