म्हणून आरएसएसच्या डोक्यावर काळी टोपी – नाना पटोले

तंत्र्याला विरोध करण्यासाठी आरएसएसच्या डोक्यावर काळी टोपी घातली. देशाचं संरक्षण कारणा-या सैन्याची चेष्टा या सरकारने केली आहे. याना देशाबद्दल धर्मा बदल प्रेम नाही अशी टीका नाना पटोळे यांनी केली आहे.

Mumbai
nana patole
काँग्रेस नेते नाना पटोले

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारासाठी तालुक्यातील अंबाडी येथे नाना पटोले यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत स्वातंत्र्याला विरोध करण्यासाठी आरएसएसच्या डोक्यावर काळी टोपी घातली. देशाचं संरक्षण कारणा-या सैन्याची चेष्टा या सरकारने केली आहे. याना देशाबद्दल धर्मा बदल प्रेम नाही अशी टीका केली आहे.

भिवंडी लोकसभेचे काँग्रेस आघाडी उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारासाठी नुकताच भिवंडी तालुक्यातील अंबाडी या मध्यवर्ती ठिकाणी एका प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस नेते नाना पटोले, माणिकराव ठाकरे कवाडे गटाचे जयदीप कवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात नाना पाटोळे यांनी आरएसएसची निर्मिती संकुचित विचाराने झाली असून.  त्यांना देशाबद्दल कधी प्रेम नव्हताच त्यामुळे त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यास नेहमीच विरोध करीत इंग्रजांकडून फडणवीस, चिटणीस या पदव्या मिळविल्या असून हे आडनाव नसून पदवी आहे. स्वातंत्र्यास विरोध करण्यासाठी डोक्यावर काळी टोपी घातली. नागपूर सारख्या विदर्भ भागाची भौगोलिक रचना पाहिल्यास तेथे डोक्यावर काळी टोपी कोणी घालणार नाही परंतु आरएसएस ने स्वातंत्र्यास विरोध करण्यासाठी काळी टोपी घातली असे सांगितले.

आरएसएसला कोणत्याही धर्मा बद्दल प्रेम नाही त्यांना फक्त या देशातील संविधान बदलून पुन्हा पेशवाई आणायची आहे. देवेंद्र व नरेंद या दोन्ही सरकारने सर्वाना ऑनलाईन करून टाकलाय आता वेळ आली आहे या सरकारला पाईपलाईन मध्ये घालायची.

वृत्तवाहिन्यावर अक्षय कुमार यांनी घेतलेली प्रदर्शित झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या मुलाखती मधून प्रमोशन करण्याचा प्रयत्न झाला का? असं विचारला असता या प्रश्नावर बोलताना नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींनी २०१४ ची निवडणूक भावनिक व जातीच्या नावाने प्रचार करून निवडणूक जिंकल्या  परंतु त्यानंतर सत्ते आल्यावर त्यांनी बहुजनांनाच, देशाच्या व्यवस्थेला संपविण्याचे,कारस्थान रचले असून आता होत असलेल्या निवडणुकीत पहिल्या तीन टप्प्यात भाजपाची पीछेहाट होत असल्याचे सर्व्हे तून पुढे येत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. म्हणून पुन्हा लांडगा आला रे आला अशी व्यवस्था निर्माण करून असे भावनिक आवाहन त्यांच्या भाषेत जुमला देण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. परंतु जनता आता फसणार नसून नरेंद्र मोदींना आरएसएसच्या विचारस मानण्यास तयार नसून संविधानिक विचारणा वाचविण्यासाठी जनता काँग्रेस च्या पाठीशी राहिल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here