घरमुंबईतिकीट वाटपानंतर भाजपमधून आऊटगोईंग होणार - नाना पटोले

तिकीट वाटपानंतर भाजपमधून आऊटगोईंग होणार – नाना पटोले

Subscribe

‘सध्या काँग्रेस राष्ट्रवादीत गडबड सुरु आहे. पण ही गडबड कायम राहणार नाही. थोडे दिवस थांबा, एकदा का तिकीट वाटप सुरु झाले की मग पहा, जी गडबड आमच्या पक्षात सुरु आहे ती तुम्हाला शिवसेना आणि भाजप पक्षांत पहायला मिळेल’, असे भाकित सोमवारी काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीचे प्रचारप्रमुख नाना पटोले यांनी मुंबईत व्यक्त केले. दरम्यान, त्यांनी यावेळी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधत नरेंद्र मोदींवर टीका केली. ‘आपल्याकडे सर्व चांगले चालले असल्याचे दाखवित मोदी अमेरिकेत दौरा करीत आहेत’, असे नाना पटोले म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काही दिवसांपूर्वी गाजलेल्या अॅक्सिस बँक प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यासाठी नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.


हेही वाचा – ..भाजपसोबत जाणं ही शिवसेनेची चूक होती – संजय राऊत

- Advertisement -

 

तिकीट वाटपानंतर संपवणारेच संपणार – नाना पटोले

नाना पटोले यांनी राष्ट्रवादीच्या मुद्दावरुन देखील भाजपवर टीका केली. राष्ट्रवाद हा निवडणुकीचा मुद्दा कसा असू शकतो? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. याशिवाय ‘राष्ट्रवाद आमच्या पक्षाला सांगण्याची गरज नसून देशाला स्वतंत्रच मुळात गांधी घराण्याने दिले आहे. त्यांना राष्ट्रवाद शिकविण्याची भाषा करु नये’, असे नाना पटोले म्हणाले. ‘सध्या काही जण इनकमिंगच्या माध्यमातून काही जणांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र एकदा तिकीट वाटप सुरु होऊ दे, त्यानंतर संपविणारेच संपणार आहेत’, असे नाना पटोले म्हणाले. महाजनादेश यात्रेच्या विरोधात महापदार्फाश यात्रेबद्दल त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, ‘मुळात ही यात्रा थोडी उशिरा काढण्यात आली होती. म्हणून तिला म्हणावा तितका वेळ मिळाला नाही. पण जेव्हा आम्ही ही यात्रा काढली, त्याचा उद्देश नक्कीच सार्थ झाला असून या यात्रेला कोणत्याही प्रकारचा अतंर्गत वादाचा फटका मिळालेला नाही’, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -