घरमुंबईनरेंद्र मेहतांनी महिलांचे शोषण केल्याचा आरोप

नरेंद्र मेहतांनी महिलांचे शोषण केल्याचा आरोप

Subscribe

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी अनेक महिलांचे शोषण केले असून याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने आपण पोलिसांकडे धाव घेतली आहे, असा गंभीर आरोप मिरा-भाईंदरमधील भाजप नगरसेविका नीला सोन्स यांनी केला आहे. दरम्यान, नरेंद्र मेहता यांनी अचानक भाजपमधून बाहेर पडण्याचा तसेच राजकारण सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध जोडला जावू लागला आहे.

नीला सोन्स यांनी नरेंद्र मेहता यांचे स्टिंग ऑपरेशन केले होते. हा व्हिडिओ त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे पाठवला मात्र संबंधित नेत्याकडून त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळेच नीला यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. आपल्या तक्रारीत मेहता यांच्याविरुद्ध गंभीर आरोप करतानाच मेहता यांच्यापासून मला व माझ्या संपर्ण कुटुंबाला धोका असल्याचे नीला यांनी नमूद केले आहे. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे.

- Advertisement -

नीला सोन्स या मिरा-भाईंदरमधील प्रभाग क्रमांक १० अ येथून निवडून आलेल्या आहेत. बुधवारी मिरा-भाईंदरच्या महापौरपदासाठी निवडणूक होत असून या पदासाठी नीला या भाजपकडून इच्छूक होत्या. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कापण्यात आला होता. त्यांच्याऐवजी ज्योत्स्ना हसनाळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नीला या नाराज असल्याचे कळते.

मिरा-भाईंदरच्या महापौर निवडीवरून पुन्हा एकदा आमदार गीता जैन आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यात राजकीय युद्ध सुरू झाल्याचे दिसत होते. या घडामोडी सुरू असतानाच अचानक सोमवारी महापौरपदासाठी अर्ज भरण्याच्या दिवशी नरेंद्र मेहता यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मी कोणत्याही दबावामुळे घेतला नसून माझ्यामुळे पक्षाचे नुकसान झाल्याच्या कारणाने घेतल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले होते. तसेच, मी भाजप पक्ष सोडत आहे, पक्षाशी एकनिष्ठ असल्याने मी अन्य पक्षात जाण्याचा विचारदेखील करू शकत नाही, यासाठी राजकारणच सोडत असल्याचेदेखील त्यांनी म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -