घरमुंबईठाण्यात महाशिवआघाडी पॅटर्न राष्ट्रवादीचा उमेदवार नाही !

ठाण्यात महाशिवआघाडी पॅटर्न राष्ट्रवादीचा उमेदवार नाही !

Subscribe

ठाण्यात महापौरपदी नरेश म्हस्के

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाशिवआघाडीचा मुख्यमंत्री होण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असतानाच, येत्या 21 नोव्हेंबरला होणार्‍या ठाणे महापौर- उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही या पॅटर्नचे पडसाद उमटल्याचे दिसून येते आहे. शिवसेनेकडून महापौर पदासाठी नरेश म्हस्के आणि उपमहापौर पदासाठी पल्लवी कदम यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज सादर केले. मात्र काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीकडून उमेदवारी अर्ज सादर केले नाही. त्यामुळे शिवसेनेचा महापौर व उपमहापौर बिनविरोध होणार असून, 21 नोव्हेंबरला घोषणेची औपचारीकता उरली आहे.

राज्यातील महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली होती. त्यात ठाण्याचे महापौरपद हे खुल्या गटाकरीता जाहिर झाल्यानंतर 21 नोव्हेंबरला महापौर- उपमहापौर पदाची निवडणूक लावण्यात आली आहे. महापौरपदासाठी महापालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के आणि उपमहापौरपदासाठी पल्लवी कदम यांनी शनिवारी पालिका नगर सचिव अशोक बुरकूले यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले. यावेळी शिवसेनेचे विधानमंडळातील गटनेते एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, महापौर मिनाश्री शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली.

- Advertisement -

ठाणे महापालिकेत शिवसेना (67) भाजप (23) राष्ट्रवादी काँगेस (34) काँग्रेस (03) एमआयएम (02) तर अपक्ष (02) असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापनेसाठी 66 ही मॅजिक फिगर आहे. शिवसेनेकडे बहुमत असल्याने स्वबळावर शिवसेनेचा महापौर उपमहापौर निवडून येणार आहे. राज्यात सत्ता स्थापनेवरून शिवसेना व भाजपच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मात्र ठाण्यात शिवसेनेला भाजपच्या साथीचीही गरज उरणार नाही. उमेदवारी अर्ज भरतेवेळी भाजपचा एकही पदाधिकारी नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी शिंदे यांची भेट घेतली. महापालिकेत भाजपपेक्षा काँग्रेस व राष्ट्रवादीचे अधिक संख्या बळ आहे. राज्यात महाशिवआघाडीची मोट बांधली जात असल्याने, राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी उमेदवार उभा करण्यात आला नाही. त्यामुळे पहिल्यांदाच ठाण्यात महाशिवआघाडी पॅटर्न दिसून आला आहे.

भोईरांची नाराजी
शिवसेनेत महापौरपदासाठी नरेश म्हस्के आणि देवराम भोईर यांची नावे चर्चेत होती. मात्र महापौरपदाच्या कमिटमेंटवरच भोईर यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे महापौरपदाची लॉटरी कुणाला लागणार, याविषयी तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र शिवसेनेने म्हस्के यांना महापौरपदाची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे

- Advertisement -

म्हणून म्हस्केंना उमेदवारी ?                                                                                              शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे खंदेसमर्थक म्हणून नरेश म्हस्के ओळखले जातात. सध्या महापालिकेतील सभागृह नेतेपद त्यांच्याकडे आहे. सभागृहातील कामकाजाचा अनुभव अणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांशी असलेले उत्तम संबध हे त्यांच्या जमेची बाजू आहे. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून ते निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. मात्र शिवसेना भाजप युतीच्या जागा वाटपात हा मतदार संघ भाजपकडे गेल्याने म्हस्के यांचा भ्रमनिरास झाला होता. त्यामुळे सेनेने त्यांना महापौरपदाची उमेदवारी दिली आहे.

उपमहापौर पदाविषयी अंधश्रध्दा                                                                                        ठाण्यातील उपमहापौर पदाविषयी एक प्रकारची अंधश्रध्द पसरलीआहे. त्यामुळे सहसा उपमहापौरपद स्वीकारण्यासाठी कोणीच तयार होत नाही. उपमहापौरपद स्वीकारल्यानंतर राजकीय कारकीर्द संपते, अशी अंधश्रध्दा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे कोणतेही पद द्या पण उपमहापौरपद नको, अशीच भावना नगरसेवकांमध्ये दिसून येते. मात्र उपमहापौरपदाची माळ महिलांच्या गळयात टाका अशी असा सूर अनेक नगरसेवकांनी लगावला होता. त्यामुळे शिवसेनेने महिला नगरसेविका पल्लवी कदम यांच्या गळयात उपमहापौरपदाची माळ पडली आहे.

राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक नसल्याने उमेदवार उभा करण्यात आलेला नाही. तसेच राज्यात शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे ठाण्यातही महाआघाडीचे पॅटर्न चे पडसाद उमटले आहे. मात्र राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार नाही.
-मिलींद पाटील, विरोधी पक्षनेता

राष्ट्रवादी काँगेसमधून शिवसेनेत प्रवेश करताना महापौर पद देण्याची मला कमिटमेंट केली होती. महिला महापौरपदाची टर्म संपली कि तुम्हाला देऊ असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. पण कोणतीही कमिटमेंट न पाळता, माझा विश्वासघात केला आहे. एकाच व्यक्तीला किती पदं देणार, शिवसेनेत अजून कोणी नाही का ? आता पुढचं महापौरपद दिलं तरी नको.
-देवराम भोईर, ज्येष्ठ नगरसेवक

ठाणे महापालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना : 67
भाजप : 23
राष्ट्रवादी काँगेस : 34
काँग्रेस : 03
एमआयएम : 02
अपक्ष : 02

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -