घरताज्या घडामोडीगणेश नाईकांना दे धक्का; भाजपाच्या ४ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

गणेश नाईकांना दे धक्का; भाजपाच्या ४ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Subscribe

नवी मुंबईतले भाजपाचे दिग्गज नेते गणशे नाईक यांचे खंदे समर्थक मानले जाणारे सुरेश कुलकर्णी काही नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पाडून महापालिकेतील ४९ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश करणार्‍या आमदार गणेश नाईकांना पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे. नवी मुंबईतले भाजपाचे दिग्गज नेते गणशे नाईक यांना धक्के देण्यास सुरुवात झाली आहे. नाईक यांचे खंदे समर्थक मानले जाणारे सुरेश कुलकर्णी काही नगरसेवकांसह शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त समोर आले आहे. आज मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हे नगरसेवत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये मुद्रीका गवळी, सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी यांच्यासह संगीता वास्के अशा एकूण चार नगरसेवकांचा समावेश असून हे चारही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजपाला पुन्हा एक मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे.

नवी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत तळ ठोकला असून नवी मुंबईतल्या वर्चस्वाला शह देण्यासाठी महाविकास आघाडीने भाजप नगरसेवकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. विशेष म्हणजे गणेश नाईक यांचे विश्वासू समजले जाणारे सुरेश कुलकर्णी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -