घरमुंबईनवरत्न स्पोर्ट्स क्लब दुसर्‍या फेरीत

नवरत्न स्पोर्ट्स क्लब दुसर्‍या फेरीत

Subscribe

मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद कबड्डी

मुंबई उपनर कबड्डी असोसिएशन आयोजित उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या सब-ज्युनियर गटात मुलांमध्ये सुरेश क्रीडा मंडळ, सन्मित्र क्रीडा मंडळ, नवरत्न स्पोर्ट्स क्लब यांनी, तर मुलींमध्ये गोरखनाथ क्रीडा मंडळ, निर्विघ्न स्पोर्ट्स क्लबने दुसरी फेरी गाठली. या निवड चाचणी स्पर्धेत मुलांमध्ये १६४ संघांनी, तर मुलींमध्ये ३५ संघांनी सहभाग नोंदवला आहे.

मुलांमध्ये सुरेश मंडळाने शिवशंभू मंडळाला २३-२२ असे नमवत या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. या सामन्याच्या मध्यंतराला सुरेश मंडळाकडे १०-९ अशी आघाडी होती. साहिल जोशीलकर, सौरभ सातपुते यांनी सुरेश मंडळाकडून उत्कृष्ट खेळ केला. सन्मित्र मंडळाने सह्याद्री मंडळाचा ३९-२५ असा पराभव केला. विश्रांतीला २१-१० अशी आघाडी घेणार्‍या सन्मित्रकडून निशान सकपाळ, नितीन तांबे उत्तम खेळले. नवरत्न स्पोर्ट्सने शरद आचार्य स्मृती प्रतिष्ठानला ३१-२१ अशी धूळ चारली. त्यांच्या या विजयात दिगंबर संसारे, कौशल हारवडे चमकले. अणु कबड्डी संघाने स्वागत साई भजनवर ५५-११ अशी, संघर्षने बाळवीरवर ५६-५ अशी, तर स्वराज्यने दादोजी कोंडदेववर ३९-७ अशी मात करत आगेकूच केली.

- Advertisement -

मुलींमध्ये गोरखनाथ क्रीडा मंडळाने अवंतिका मालपेकर, किरण साठे यांच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर स्वस्तिक क्रीडा मंडळाचा ५६-१६ असा पराभव केला. निर्विघ्नने यशवंत चादजी मंडळाला ४७-१० असे पराभूत केले. नवशक्ती अकादमीने युनिव्हर्सल स्पोर्ट्सचा ५९-१६ असा पराभव केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -