घरताज्या घडामोडीमहापालिकेचा स्तुत्य उपक्रम: नवरात्रौत्सवातील घटांचा वापर झाडांसाठी

महापालिकेचा स्तुत्य उपक्रम: नवरात्रौत्सवातील घटांचा वापर झाडांसाठी

Subscribe

नवरात्रौत्सवातील घट स्थापनेकरिता वापरण्यात येणाऱ्या कलशाचा वापर यंदा महापालिकेने ग्रीन कलशात केले आहे. दरवर्षी देवीच्या विसर्जनाबरोबरच विसर्जित करण्यात येणारे हे कलश निर्माल्यांमध्ये जमा करून मातीत मिसळले जातात. परंतु यंदा महापालिकेने याचा वापर ग्रीन कलशात करून त्याचा वापर शोभिवंत झाडांच्या कुंडीसाठी केला. ज्यामुळे या आकर्षक सजवलेल्या कलशात लावलेली झाडांची रोपे अधिकच खुलून दिसून लागली.

नवरात्रौत्सवात देवी मातेची घरोघरी घटस्थापना केली जाते. हे घट अर्थात कलश प्रत्येक जण आपल्या पध्दतीने कलाकसुर करत आकर्षक बनवत असतो. त्यानंतर दहा दिवसांनी देवी विसर्जनाच्या दिवशी हे कलश विसर्जनस्थळांवर गोळा केले जातात. दरवर्षी हे कलश महापालिकेच्यावतीने एकत्र गोळा करून एकत्र फोडले जातात आणि मातीत मिसळले जातात.

- Advertisement -

परंतु यंदा महापालिकेच्या आर- दक्षिण विभागाच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी हे सर्व कलश गोळा करून त्यांचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला. यातील जे काही कलश तुटलेले असेच तडा गेलेले होते, ते पुन्हा मातीत मिसळण्यात आले. तर जे कलश सुस्थितीत होते. आर दक्षिण विभागाच्या रोपवाटिकांमध्ये आणण्यात आले. त्यामध्ये माती भरून शोभिवंत झाडे तथा रोप लावण्यात आली. ही रोप लावताना कलशाचा वापर कुंडीस्वरुपात करण्यात आला. त्यामुळे आकर्षक रंगरंगोटीसह सजवलेले या कलशात शोभिवंत झाडे अधिक खुलून दिसून लागली.

महापालिकेच्या उद्यान विभागाचे उपायुक्त रमाकांत बिरादर यांच्या मार्गदर्शनाखाली आर दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संजय कुऱ्हाडे तसेच उद्यान विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विसर्जित करण्यात येणाऱ्या कलशांना या रोपवाटिकेमध्ये आणून पर्यावरणपुरक अशा हरित कलशाची निर्मिती केली. या कलशातील शोभिवंत झाडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह नगरसेवकांना देऊन एकप्रकारे देवीचा आशिर्वाद म्हणून भेट स्वरुपात दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -