Video : नवाब मलिकांच्या भावाची ‘दादागिरी’, कामगारांना केली मारहाण!

नवाब मलिक यांचे भाऊ आणि पालिकेतील नगरसेवक कप्तान मलिक यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून नवाब मलिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Mumbai
kaptan malik
कप्तान मलिक यांचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे.

सर्वात मोठा पक्ष ठरून देखील भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या महाविकासआघाडीच्या कारभाराकडे डोळ्यात तेल घालून जनता पाहात आहे. मात्र, आता विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपच्या हाती आयतं कोलीत देण्याची संधी राज्याचे अल्पसंख्य मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ आणि नगरसेवक कप्तान मलिक यांनी देऊ केली आहे. कप्तान मलिक यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये ते काही कामगारांना मारहाण करताना दिसत आहेत. कामगार करत असलेल्या कामाबद्दल विचारणा करत असताना अचानक त्यांनी कामगारांना मारण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे नवाब मलिक यांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे. त्यामुळे अद्याप नवाब मलिक यांची या मुद्द्यावर प्रतिक्रिया आलेली नाही.

काय आहे या व्हिडिओमध्ये?

या व्हिडिओमध्ये काही काम करत असलेल्या कामगारांना कप्तान मलिक वर्क ऑर्डर संदर्भात विचारणा करत आहेत. मात्र, आपल्याला वर्क ऑर्डरविषयी माहिती नाही, असं म्हणत या कामगारांनी वर्क ऑर्डर देण्यास असमर्थता दर्शवली. यावर भडकलेल्या कप्तान मलिक यांनी थेट कामगारांना मारहाण करायला सुरुवात केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

कामगारांना मारणाऱ्या कप्तान मलिकांचा व्हिडिओ व्हायरल !

कामगारांना मारणाऱ्या कप्तान मलिकांचा व्हिडिओ व्हायरल !

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜನವರಿ 14, 2020

दरम्यान, यावर बोलताना मंत्री बच्चू कडू यांनी ठाम भूमिका घेतली असून, ‘जर त्यांनी चूक केली असेल, तर त्यांनी माफी मागावी’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

'नवाब मलिकांच्या भावाने माफी मागायला हवी'

'नवाब मलिकांच्या भावाने माफी मागायला हवी'

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜನವರಿ 14, 2020