घरताज्या घडामोडीड्रग्जप्रकरणी नबाव मलिक यांच्या जावयाला NCB कोठडी

ड्रग्जप्रकरणी नबाव मलिक यांच्या जावयाला NCB कोठडी

Subscribe

ड्रग्जप्रकरणी राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर शब्बीर खान यांना लोकल कोर्टाने सोमवार १८ जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत कोठडीत असलेल्या सिनेअभिनेत्री दिया मिर्झाची माजी मॅनेजर राहिला मोहम्मद हुसैन फर्नीचरवाला आणि विदेशी नागरिक करण लेखू सेजनानी यांच्या एनसीबी कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या तिघांनाही गुरुवारी बंदोबस्तात लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

शायस्ताला जामिनावर सोडण्यात आले

नवाब मलिक हे राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत. समीर खान हा त्यांचा जावई आहे. गेल्या आठवड्यात राहिला फर्नीचरवाला, तिची बहीण शायस्ता मोहम्मद हुसैन फर्निचरवाला, ब्रिटीश नागरिक करण लेखू सेजनानी या तिघांना एनसीबीच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. करण याने अमेरिकेतून एका कुरिअरमधून उच्च प्रतीचा गांजा आणला होता, या गुन्ह्यांत या तिघांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. चौकशीत त्यांचा सहभाग उघडकीस येताच या तिघांनाही एनसीबीच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. यावेळी राहिला आणि करण यांना १४ जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली तर शायस्ताला न्यायालयीन कोठडीनंतर जामिनावर सोडून देण्यात आले होते.

- Advertisement -

राहिला आणि करणला पुन्हा शनिवारी कोर्टात हजर करणार 

करण हा मुंबई शहरात वास्तव्यास असलेल्या हायफाय लोकांना या गांजाचा पुरवठा करीत होता. याच गुन्ह्यांत नंतर समीर खान यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स एनसीबीकडून बजाविण्यात आले होते, या समन्सनंतर समीर हे बुधवारी सकाळी साडेदहा वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. तब्बल दहा तास चौकशी केल्यानंतर त्यांना या गुन्ह्यांत एनसीबीने अटक केली होती. अटकेनंतर त्यांना गुरुवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने समीरला सोमवारपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. अटकेनंतर समीरच्या वांद्रे येथील राहत्या घरी एनसीबीच्या अधिकार्‍यांनी छापा टाकला होता. मात्र या कारवाईत या अधिकार्‍यांना काहीच सापडले नाही. याच गुन्ह्यांत जुहू येथे कारवाई सुरू असून या कारवाईचा तपशील समजू शकला नाही. दुसरीकडे राहिला आणि करण यांच्या एनसीबी कोठडीची मुदत संपत होती. त्यामुळे या दोघांनाही पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांच्याविरुद्ध काही पुरावे सापडले असून त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे, असे एनसीबीकडून सांगण्यात आले. त्यानंतर या दोघांच्या एनसीबी कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या दोघांना आता शनिवारी पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे.


हेही वाचा – रेणू शर्माच्या हनी ट्रॅपमध्ये आता चौथा इसम

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -