घरमुंबईधर्माच्या आधारावर नागरिकत्व देणे अयोग्य - नवाब मलिक

धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणे अयोग्य – नवाब मलिक

Subscribe

देशाच्या घटनेत धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणे योग्य नसून याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली आहे.

लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी आज नागरिकत्व दुरस्ती विधेयकाचा प्रस्ताव मांडला आहे. आता या विधेयकाला विरोधकांकडून जोरदार विरोध होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या विधेयकाला विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी देशाच्या घटनेत धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणे योग्य नसल्याचे सांगत याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

तसेच ‘या कायद्याची खरी बाजू भाजप सांगत नाही. आसामच्या घटनांमुळे हा कायदा आणला जात आहे. आसाम असो किंवा इशान्य भारतातील कोणतेही राज्य या कायद्याचे समर्थन करत नाही. हा कायदा देशाचे विभाजन करणारा असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच या कायद्याने देशाचा फायदा नाही. उलट घुसखोरांना नागरिकत्व देण्याचे काम भाजप करत असल्याचे ते म्हणाले आहेत. एवढच नाही तर नोटबंदी करून यांनी देशाला बरबाद केले आणि आता हे बिल आणून पुन्हा एकदा लोकांना त्रास देण्याचे काम करून लोकांना हे सरकार रांगेत उभे करणार असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली. या विधेयकामुळे देशात भूमीहीन लोकांची सख्या वाढेल अशी देखील त्यांनी सांगितले. या विधेयकामुळे जे शिकलेले नाहीत, आदिवासी आहेत त्यांचे नुकसान होईल आणि देशात एक हाहाकार होईल, असे देखील नवाब मलिक यावेळी म्हणालेत.

- Advertisement -

वोट बँकसाठी हा प्रयत्न

दरम्यान, यावेळी नवाब मलिक यांनी हे विधेयक आणून भाजप वोट बँक मिळवण्यासाठी हे सर्व करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच कुठल्याही राज्याची लोक हा कायदा स्विकारायला तयार नसल्याचे सांगत घटनेमध्ये तरतूद नसताना हा कायदा करणे म्हणजे घटनेला विरोध असल्याचे म्हणत जो गुरखा समाज आहे त्या समाजाने देखील या कायद्याला विरोध केल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा – विरोधीपक्ष नेता नसणार म्हणणारे विरोधीपक्ष नेते झाले – बाळासाहेब थोरात

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -