Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई नवाब मलिकांचा जावई समीर खानला NCB कडून अटक

नवाब मलिकांचा जावई समीर खानला NCB कडून अटक

Related Story

- Advertisement -

ठाकरे सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCBकडून आज रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. एनसीबीने याआधीच समीर खान यांना ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात समन्स बजावला होता. आज बुधवारी सकाळी चौकशीसाठी समीर खानला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ड्रग्ज माफिया करन सजनानी आणि समीर खान यांच्यात झालेल्या पैशांच्या व्यवहाराबाबतची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर खाने यांना चौकशीसाठी बोलावले होते. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्याने भाजपकडूनही महाविकास आघाडीला टार्गेट करायला सुरूवात झाली होती. आज दिवसभरात झालेल्या सविस्तर चौकशीनंतरच समीर खान यांना एनसीबीकडून अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी सविस्तर सुरू असल्याचे एनसीबीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वी वांद्रे येथून करन सजनानीला अटक केली होती. करन सजनानीकडे २०० किलो गांजा सापडला आहे. सजनानी आणि समीर खान यांच्यात काही दिवसांपूर्वी 20 हजार रूपयांचा गुगल पे च्या माध्यमातून एक आर्थिक व्यवहार झाला. या आर्थिक व्यवहारामुळेच एनसीबीने समीर खान यांना समन्स बजावला होता. त्यानंतर समीर खान आज बुधवार एनसीबीसमोर चौकशीला हजर राहिले होते. बॉलिवुड स्टार सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीने बॉलिवुड सेलिब्रिटींना टार्गेट केल्यानंतर आता मोर्चा हा राजकीय नेत्यांकडे वळवला आहे.

- Advertisement -

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी या संपुर्ण प्रकरणात केली आहे. ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई ड्रग कार्टेलचे समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. म्हणूनच नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

- Advertisement -