बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी NCB चा छापा, ड्रायव्हर ताब्यात

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी बड्या अभिनेत्याच्या घरी NCB चा छापा

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्यानंतर एनसीबीने अनेक ठिकाणी छापे मारण्यास सुरुवात केली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर ड्रग्ज अँगल समोर आला त्यानंतर एनसीपी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनचा तपास करत आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक झाली. तर आतापर्यंत दीपिका पदूकोण, सारा अली खान यांच्यासह अनेकांची चौकशी झाली. शिवाय या प्रकरणात अर्जुन रामपालचे नावही समोर आलं आहे. रविवारी चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरी आणि कार्यालयात एनसीबीने छापा घातल्यानंतर आज सकाळी ७ वाजता अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी छापा घालण्यात आला असून अद्याप एनसीबीच्या ताब्यात आहे.

दरम्यान, बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड ग्रॅबिएला डेमोट्रियड्सच्या भावाला अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्याला काही अटींवर जामीन देण्यात आला होता. मात्र, त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. तसेत आज सकाळपासूनच एनसीबीने काही ठिकाणी धाडी मारली आहे. मुंबईत मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर, कोपरखैरनेसह काही भागात ड्रग्ज पेडलर्सच्या अड्डयांवर एनसीबीने आज छापे मारले. यावेळी एनसीबीने चार ड्रग्ज पेडलर्सना अटक केली आहे.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन रामपालच्या चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. तर एनसीबी आधीच बॉलिवूड ड्रग्स रॅकेटच्या प्रकरणात चौकशी करीत आहे. या प्रकरणात अर्जुन रामपालचे नावही समोर आले आहे.


बॉलिवूडचे निर्माते नाडियाडवाला यांच्या घरी NCBचा छापा