कॉमेडियन भारती सिंहच्या घरी NCBचा छापा

एनसीबीने केली भारतीच्या घरी कारवाई.

NCB raid at the residence of comedian bharti singh in mumbai
कॉमेडियन भारती सिंहच्या घरी NCBचा छापा

बॉलिवुडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष यांना एनसीबी चौकशीसाठी समन्स बजावला आहे. एनसीबीने भारती आणि हर्ष यांच्या घरी छापेमारी केली आहे. भारती आणि तिचा पती हर्ष यांच्या मुंबईच्या अंधेरी लोखंडवाला आणि वर्सोवा परिसरात असलेल्या घरांवर एनसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे. या दोघांनाही एनसीबी ऑफिला नेण्यात आले आहेत. राहत्या घरात ड्रग्ज आढळून आल्याने एनसीबीकडून भारती आणि तिच्या पतीची चौकशी सुरू आहे.

एका ड्रग्ज पेडरलच्या माहितीवरून एनसीबीने भारती आणि हर्षच्या घरांवर छापा टाकला. अंधेरी आणि वर्सोवा परिसरात एनसीबी शोध घेत आहेत. एनसीबीने भारतीच्या घरी कारवाई केली. कारवाई दरम्यान भारतीच्या घराची झडती घेण्यात आली तेव्हा घरात ड्रग्ज आढळून आले. त्यामुळे भारती आणि तिचा पती हर्ष यांना एनसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.  या आधी अभिनेता अर्जुन रामपाल याच्या घरी एनसीबीकडून कारवाई करण्यात आली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू नंतर बॉलिवुडमध्ये असलेले ड्रग्ज कनेक्शन बाहेर आले. यात बॉलिवुडमधील अनेक दिग्गज कलाकरांची नावे समोर आली. या कलाकरांवर एनसीबीकडून कारवाई करण्याता आली. अभिनेत्री आणि कॉमेडियन भारती सिंह हिचेही नाव आता ड्रग्जमध्ये आले आहे. भारती आणि तिचा पती हर्ष यांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे.


हेही वाचा – सलमान कोरोना निगेटिव्ह, आता पुन्हा एकदा बिग बॉसचा होस्ट