Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई समीर खान यांची घरी NCBची छापेमारी

समीर खान यांची घरी NCBची छापेमारी

बुधवारी अटक केल्यानंतर समीर खान यांच्या वांद्रे येथील घरावर सकाळी एनसीबीने छापेमारी केली आहे. बुधवारी एनसीबीने समीर खान यांना चौकशीसाठी बोलावले होते.

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावाई समीर खान यांना काल एनसीबीने अटक केली. या आधी ड्रग्ज कनेक्शनमध्ये समीर खान यांना एमसीबीने समन्स बजावला होता.  बुधवारी अटक केल्यानंतर समीर खान यांच्या वांद्रे येथील घरावर आज सकाळी एनसीबीने छापेमारी केली आहे. बुधवारी एनसीबीने समीर खान यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर दिवसभर झालेल्या चौकशीनंतर एनसीबीकडून समीर खानला अटक करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर करन सजनानी याच्या सोबत समीर खान यांचे ड्रग्ज कनेक्शन असल्याचे एनसीबीच्या निदर्शनास आले. दोन दिवसांपूर्वी करन साजनानी याला वांद्रे येथून अटक करण्यात आली होती. करन सजनानीकडे २०० किलोचा गांजा एनसीबीने जप्त केला. यातील १०० किलोपेक्षा जास्त गांजा हा उत्तर प्रदेशातील रामपूर येथून आला होता. त्यामुळे एनसीबीची उत्तर प्रदेशातील टिमही या प्रकरणाचा तपास करत आहे. त्याचबरोबर सजनानी आणि समीर खान यांच्यात गुगल पेच्या माध्यमातून २० हजार रूपयांचा व्यवहारही झाल्याचे निदर्शनास आले. या आर्थिक व्यवहारामुळे एनसीबीने समीर खान यांना समन्स बजावला होता. त्यानुसार समीर खान बुधवारी एनसीबीच्या चौकशीसाठी हजर झाले. काही तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने समीर खान यांना अटक केली. आज सकाळी एनसीबीने समीर खानच्या राहत्या छापेमारीही केली.

- Advertisement -

एमसीबीने काही दिवसांपूर्वी मुच्छड पानवाला याला ड्रग्ज प्रकरणी अटक केली. त्याच्या चौकशीदरम्यान नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे नाव समोर आले. समीर खान हे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर हिचे पती आहेत. त्यांच्या रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. समीर खान यांच्या तब्बल १० तासांच्या चौकशीनंतर एमसीबीने त्यांना अटक केली. एनसीबीच्या रडारवर समीर खान यांच्यासोबत अनेक बडे उद्योजक आणि नव्वदच्या दशकतील एक अभिनेता असल्याचे सांगितले जात आहे.


हेही वाचा – नवाब मलिकांचा जावई समीर खानला NCB कडून अटक

- Advertisement -

 

- Advertisement -