घरमुंबईराष्ट्रवादीकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

राष्ट्रवादीकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Subscribe

अखेर पार्थ पवारला मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आज ५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारी यादी जारी केली. अखेर शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघातून धनराज हरिभाऊ महाले, नाशिकमधून छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ, नुकताच शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या अमोल कोल्हे यांना शिरुरमधून उमेदवारी तर बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पुढची यादी दोन दिवसात होणार जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी १२ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज पुन्हा ५ उमेदवारांची यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी ही यादी जाहीर केली. लोकसभेची आणखी काही उमेदवारांची यादी शिल्लक आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्षासोबत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकत्रित नावे जाहीर केली जातील असेही प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सांगितले. पवार साहेबांनी माढा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांशी सल्लामसलत करून नाव जाहीर केले जाईल असे सांगतानाच एक दोन दिवसात इतर नावांची यादीही जाहीर केली जाईल असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -
Parth Pawar
पार्थ पवार

मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु होत्या. तसंच पार्थ पवार मावळ की माढामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशा देखील चर्चा सुरु होत्या. मात्र आज पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवणआर यावर शिक्कामोर्तब झाला आहे. पार्थ पवार मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत.

amol_kolhe_
अमोल कोल्हे

अमोल कोल्हेंना शिरुरमधून उमेदवारी

शिवसेनेचे शिवबंधन सोडून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात घातलेल्या अमोल कोल्हे हे देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisement -
sameer bhujbal
समीर भुजबळ

नाशिकमध्ये समीर भुजबळ यांना उमेदवारी

नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ काका पुतण्यांपैकी कोण लोकसभा निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मतदारसंघातून राष्ट्रवादीने माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नाशिक मतदारसंघाचा इतिहास बदलण्याची संधी समीर भुजबळ यांना प्राप्त झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -