घरमुंबई'विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करतंय'

‘विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करतंय’

Subscribe

विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करतंय असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली आहे.

पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला आहे. आज शिवसेनेमार्फत जो मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये फक्त शिवसैनिक होते. महाराष्ट्रातील शेतकरी कुठे होते?, असा सवालही जयंतराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पिळवणूक ज्या विमा कंपन्यांनी केली आहे, त्यावर तोडगा निघू शकतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. परंतु, सरकारची मर्जी दिसत नाही. दुर्दैवाने सत्तेतील एक पक्ष विरोधी पक्षाची भूमिका घेऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशी जोरदार टीकाही जयंतराव पाटील यांनी केली आहे. नुसता मोर्चा काढून शिवसेनेला हात झटकता येणार नाहीत. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी निर्णय घ्यायचे असतात. रस्त्यावर उतरून मोर्चे काढायचे नसतात हे शिवसेनेला कुणी तरी सांगायची गरज आहे‘, असा टोला जयंतराव पाटील यांनी लगावला आहे.

- Advertisement -

सेनेचा विराट मोर्चा

शिवसेनेने पीक विमा कंपन्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. मुंबईतील बीकेसीतून या मोर्चाला सुरुवात झाली होती. या मोर्चामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या मोर्चासाठी राज्यभरातून शिवसेनेचे कार्यकर्ते आले होते. याशिवाय राज्यभरातील शेतकरी देखील यामध्ये सहभागी झाले होते. मोर्चामध्ये प्रचंड गर्दी जमा झाली होती. पीक वीमा शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी वैतागला आहे. एकीकडे दुष्काळाचे सावट तर दुसरीकडे पीक विमा कंपन्यांकडून होणारा विश्वासघात यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे शिवसेनेने हा पीक विमा कंपन्यांच्या विरोधात मुंबईत मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चेत शिवसेनेच्या बड्या नेत्यांचा समावेश होता. यामध्ये आदित्य ठाकरे, रामदार कदम, दीपक सावंत, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे आदींचा समावेश होता.


हेही वाचा – सेनेच्या विराट मोर्चाला सुरुवात; उद्धव ठाकरेंसह बड्या नेत्यांची उपस्थिती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -