घरमुंबई'बाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते'

‘बाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते’

Subscribe

बाळासाहेंबाना अभिवादन करत छगन भुजबळांनी जागवल्या आठवणी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने शिवतीर्थावर मोठी गर्दी होत आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दाखल झाले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे ही उपस्थित होते. छगन भुजबळ ही एकेकाळी शिवसैनिक होते. शिवसेनेत असताना त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भुषवली आहेत. त्यानंतर शिवसेना सोडून ते राष्ट्रवादीत गेले. पण, आज पुन्हा स्मृतिदिनाच्या निमित्ताने छगन भुजबळ शिवतीर्थावर दाखल झाले आणि त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

बाळासाहेबांनी बघितलेलं स्वप्न पुर्ण करणं गरजेचं 

दिवसातून एकदा तरी रोज बाळासाहेबांची आठवण येते. बाळासाहेबांसोबत मी २५ वर्षे कार्यरत होतो. शिवसेनेचे चढ-उतार, लढाई होत्या त्यामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी होत होतो. त्या सर्वाचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे, दिवसातून एकदा तरी बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि बाळासाहेबांनी जे स्वप्न बघितलंय ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं असल्याचंही राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं.

- Advertisement -

संपूर्ण राज्यातून शिवसैनिक मुंबईत दाखल

आज बाळासाहेबांचा स्मृतीदिन असल्याकारणाने मुंबईतूनच नाही तर संपूर्ण राज्यातून शिवसैनिक मुंबईत दाखल होतात. बाळासाहेबांच्या स्मृतिंना अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. शिवसैनिकांनी सकाळपासूनच बाळासाहेंबाना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे, शिवाजी पार्कात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आली आहे.

जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेतेही स्मृतिस्थळावर दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारपासूनच शिवाजी पार्क येथे तयारी सुरू करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनाही शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.


‘स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी दिला’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -