घरमुंबईमुख्यमंत्री निवासस्थानी डान्सबारबाबत 'डील' झाली - नवाब मलिक

मुख्यमंत्री निवासस्थानी डान्सबारबाबत ‘डील’ झाली – नवाब मलिक

Subscribe

दोन वर्षापूर्वी भाजपचा वरिष्ठ नेता आणि डान्सबार मालक यांच्यात बैठक झाली. शायना एनसी आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मध्यस्थी केली होती आणि त्यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्सबारबाबत डील झाली असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान नवाब मलिक यांनी हा आरोप केला आहे. सुप्रीम कोर्टाने डान्सबारवर असलेली बंदी उठवल्यानंतर आता जोरदार टीका सुरु झाली आहे. वेगवेगळया पक्षाच्या नेत्यांनी आता सरकारवर टीका करण्यास सुरुवात करत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

आमचे सरकार आल्यावर पुन्हा बंदी आणू

दोन वर्षापूर्वी भाजपचे वरिष्ठ नेता आणि डान्सबार मालक यांच्यात बैठक झाली. शायना एनसी आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मध्यस्थी केली होती आणि त्यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारने बाजू कमकुवत ठेवली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान आमचं सरकार आलं की, पुन्हा डान्सबार बंदी आणणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

- Advertisement -

शस्त्रसाठा भाजपने आणला

डोंबिवली शस्त्रसाठा प्रकरणात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आरोपीची पाठराखण करत असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे पोलिसांनी धनंजय कुलकर्णी याचा रिमांड मागितला नाही, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. हा शस्त्रसाठा परदेशी बनावटीच्या आहे. हा साठा भाजपने आणल्याचा आरोप करतानाच किती विदेशी बनावटीची हत्यारे आणली? ही तस्करी आहे का? संपुर्ण महाराष्ट्रामध्ये ही हत्यारे दिली आहेत का? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत अशाच हत्यारांचा वापर झाल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

डान्सबारवरील बंदी उठवल्यानंतर आबांची लेक भडकली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -