Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम बॉलिवुडनंतर राजकारणाचे ड्रग्ज कनेक्शन; नवाब मलिकांच्या जावयाला NCB चे समन्स!

बॉलिवुडनंतर राजकारणाचे ड्रग्ज कनेक्शन; नवाब मलिकांच्या जावयाला NCB चे समन्स!

Related Story

- Advertisement -

बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवुडमधले अनेक ड्रग्ज कनेक्शन्स उघडे पडले. यामध्ये बॉलिवुडमधली अनेक मोठी नावं समोर आली. नुकतंच एनसीबीनं मुच्छड पानवाला या दक्षिण मुंबईतल्या प्रसिद्ध पानवाल्याला ड्रग्जची साठवणूक आणि पुरवठा प्रकरणी अटक केली आहे. त्याचे अनेक बॉलिवुडकरांशी संबंध असल्याचं देखील समोर आलं आहे. आता एनसीबीनं आपला मोर्चा राजकारणाच्या ड्रग्ज कनेक्शनकडे वळवला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला NCB नं समन्स बजावलं आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता समीर खान एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये खळबळ उडाली असून विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या नेतेमंडळींनी आता या मुद्द्यावरून रान उठवायला सुरुवात केली आहे.

दोन दिवसांपूर्वी एनसीबीनं वांद्रे येथून करन सजनानीला अटक केली होती. करन सजनानी हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ड्रग्ज माफिया असून त्याच्याकडे एनसीबीला तब्बल २०० किलो गांजा सापडला आहे. करन सजनानी आणि समीर खान यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी २० हजार रुपयांचा गुगल पेवरून व्यवहार झाला होता. या प्रकरणात एनसीबीनं चौकशीसाठी समीर खान यांना समन्स बजावलं आहे. ही पैशांची देवाणघेवाण नक्की कशासाठी करण्यात आली होती? याविषयी एनसीबी समीर खान यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान, एनसीबीनं समीर खान यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर आता भाजपकडून या मुद्द्यावरून सरकारला टार्गेट केलं जात आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यावर टीका करणारं ट्वीट केलं आहे. ‘आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्यांचे जावईच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या चौकशीत आले आहेत. नवाब मलिक यांनी याचं उत्तर द्यावं’, असं सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -