घरमुंबईना भाजपला पाठिंबा देणार ना शिवसेनेला - प्रफुल्ल पटेल

ना भाजपला पाठिंबा देणार ना शिवसेनेला – प्रफुल्ल पटेल

Subscribe

सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी ना भाजपला पाठिंबा देणार ना शिवसेनेला, असे ठामपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

सत्तास्थापने वरुन भाजप-शिवसेना महायुतीत अद्याप चर्चाच सुरु आहेत. त्यामुळे राज्यातील सत्ता कशी असणार? या बाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यापूर्वीच सत्तास्थापनेतील आपली भूमिका स्पष्ट केलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा सत्ता स्थापनेतील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी ना भाजपला पाठिंबा देणार ना शिवसेनेला, असे ठामपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

२०१४ च्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढले होते. तर २०१९ रोजी विधानसभा निवडणुकीत महाआघाडी आणि महायुती करुन निवडणूक लढवली गेली. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ना भाजपला, ना शिवसेनेला पाठिंबा देणार नाही. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्यास सांगितलं आहे. परिस्थिती बदललीच, तर त्यावेळी ठरवू, असंही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.

- Advertisement -

भाजप-शिवसेनेमधील रस्सीखेच निव्वळ दिखावा

सत्तास्थापनेसाठी भाजप-शिवसेनेत जी रस्सीखेच सुरु आहे तो निव्वळ दिखावा आहे असे म्हणताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “भाजप-शिवसेनेत जे काही सुरु आहे ते केवळ नाटक आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेने आपल्यातील भांडण मिटवावं. काही मतभेद असतील तर त्यांनी ते दूर करावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -