घरमुंबईशेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात केंद्र सरकार अपयशी - सुप्रिया सुळे

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात केंद्र सरकार अपयशी – सुप्रिया सुळे

Subscribe

दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा प्रश्न सोडविण्यात केंद्र सरकार अपयशी असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दक्षिण मुंबईतील ताडदेव तुळशीवाडी परिसरातील ताडदेव ग्राउंडवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष विजय वाडकर आणि मेघवाल समाजाचे नेते व समाजसेवक विजय कोळी यांच्या प्रयत्नाने ताडदेव तुळशीवाडी येथील तुळशीवाडी मैदानात महारक्तदान शिबिर भरवण्यात आले होते.

दिल्लीच्या सीमारेषांवर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने जमा झाले असून केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी कायद्यांना या आंदोलक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हे कायदे तातडीने रद्द करावेत आणि सरकारने हमीभावासंदर्भात तातडीने निर्णय ध्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. मात्र, आंदोलकांमध्ये कायद्यंबाबत गैरसमज पसरवला गेला असल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे.

- Advertisement -

मागील आठवड्यात राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर विविध पक्षांच्या वतीने ठिकठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या धर्तीवर दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर यांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून विभागातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -