KBC विरोधात राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा

राष्ट्रवादीकडून आज दुपारी १२ वाजता मालाड येथील 'सोनी' वाहिनीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी दिली.

Mumbai

‘सोनी’ वाहिनीवर ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा नामोल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीकडून आज दुपारी १२ वाजता मालाड येथील ‘सोनी’ वाहिनीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी दिली.

काय आहे नेमके प्रकरण?

‘सोनी’ वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून याचा निषेध म्हणून आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सदरबाबीचा निषेध करण्यासाठी आज सोनी पिक्चर्स नेटवर्कच्या मालाड येथील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे.

नेटीझन्सही आक्रमक

दरम्यान, शिवाजी महाराजांचे एकेरी नाव घेतल्यामुळे सोशल मीडियावर देखील प्रकरण प्रचंड चर्चेत आले आहे. ट्विटरवर #Boycott_KBC_SonyTv असा ट्रेंड सुरु आहे. या हॅशटॅगमार्फत ‘सोनी’ वाहिनीवर टीका होत आहे.


हेही वाचा – video : पतीसाठी राखी सावंत झाली टॉपलेस…व्हिडिओ व्हायरल