Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंडेंबाबत शुक्रवारी निर्णय, राष्ट्रवादीने बोलावली बैठक

मुंडेंबाबत शुक्रवारी निर्णय, राष्ट्रवादीने बोलावली बैठक

Related Story

- Advertisement -

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील एका महिलेने केलेले बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. या प्रकरणात कोर्ट आणि पोलीस काय कारवाई करायची ती करतील. पण पक्ष मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.

शरद पवार गुरुवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्यावरील आरोपांसंदर्भात सविस्तरपणे भाष्य केले. धनंजय मुंडे हे बुधवारी मला भेटले. मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला सविस्तर माहिती दिली. त्यानुसार धनंजय मुंडे यांचे काही व्यक्तींशी संंबंध होते. त्यावरून मुंडे यांच्याविरोधात काही तक्रारी करण्यात आल्या आहेत. हे प्रकरण या दिशेने जाईल, याची कल्पना धनंजय मुंडे यांना होती. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घेतला होता. त्यामुळे या प्रकरणात फारसे बोलण्यासारखे काहीही नाही. मात्र पक्षाने हा विषय गांभीर्याने घेतला असून लवकरच मुंडेंबाबत पक्षाच्या इतर नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मात्र मलिक प्रकरणात त्यांचा काहीही दोष नाही,असेही पवार म्हणाले.

- Advertisement -

आता धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत बोलायचे झाल्यास ते गंभीर स्वरूपाचे आहेत. एक पक्ष म्हणून या सगळ्याचा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. पक्षातील प्रमुख सहकार्‍यांशी माझं अद्याप बोलणं झालेलं नाही. मात्र, मी त्यांना विश्वासात घेऊन धनंजय मुंडे यांनी मला दिलेली माहिती त्यांच्यापुढे मांडणार आहे. त्यानंतर आम्ही धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेऊ असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यासाठी फार वेळ लागणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस तातडीने निर्णय घेईल, असेही शरद पवार यांनी सांगितले.

- Advertisement -