निलम गोऱ्हे यांनी मुनगंटीवार यांच्यावर केली टीका

उद्धव ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमा म्हणजे सत्य काय आहे ते बाहेर येईल, असे वक्तव्य शिवसेनेच्या प्रवक्ता डॉ. निलम गोऱ्हे यांनी केले आहे.

Mumbai
neelam gorhe
महिलांच्या हक्कासाठी नीलम गोऱ्हे आझाद मैदानावर

जे स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत त्यांनी उद्धव साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या वल्गना करू नयेत. ‘उद्धव ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमा म्हणजे सत्य काय आहे ते बाहेर येईल’. शिवसेना प्रवक्ता डॉ निलम गोऱ्हे यांचा मुनगंटीवार यांच्यावर पलटवार केला आहे. अवनी वाघिणीच्या शिकारावरून सर्व बाजून सरकारवर टीका होत असतानां गोऱ्हे यांनीही कसून टीका केली आहे.

काय म्हणाल्या गोऱ्हे

उद्धव ठाकरे यांना वाघ आणि जंगल या दोन्ही विषयातील सखोल माहिती आहे. उलट ते टी १ वाघिणीची हत्या कशी झाली याची सखोल चौकशी करतील आणि खऱ्या गुन्हेगारांना सगळ्यांसमोर आणतील, मात्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वाघिणीच्या हत्येचे आरोप आहेत आणि ज्यांच्या कार्यकर्तुत्वाची चौकशी करण्यसाठी समिती नेमून त्याना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे त्यांनी उद्धवसाहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या वल्गना करू नयेत, हा अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे, मुख्यमंत्री महोदयांच्या अधिकारांवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गदा आणत आहेत का? असा सवाल करत शिवसेना प्रवक्ता डॉ नीलम गोर्हे यानी वनमंत्र्यांवर पलटवार केला आहे. उद्धव साहेब ठाकरे यांनी शासनाने नेमलेली चौकशी समिती ही फार्स असल्याची टीका केली होती त्यावर आपण उद्धव साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमतो असे सुधीर मुनगंटीवार यानी जाहीर केले त्याबाबत प्रतिक्रीया देताना डॉ नीलम गोर्हे बोलत होत्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here