घरमुंबईमहिलांच्या हक्कासाठी नीलम गोऱ्हे आझाद मैदानावर

महिलांच्या हक्कासाठी नीलम गोऱ्हे आझाद मैदानावर

Subscribe

महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या प्रश्नांसाठी आमदार नीलम गोऱ्हे मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. या महिलांचे प्राधिकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

महिलांच्या हक्कासाठी शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे आज आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या प्रश्नांसाठी त्या मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. या महिलांचे प्राधिकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्या शेतकरी आत्महत्याग्रस्त पिडीत महिलांच्या विविध मागण्यांसाठी महिला किसान अधिकार मंचच्या वतीने आज आझाद मैदान येथे धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. या आंदोलनामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी देखील सहभाग घेतला आहे.

हेही वाचा – नीलम गोऱ्हे यांनी मुनगंटीवार यांच्यावर केली टीका

- Advertisement -

काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?

आमदार नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या पाठीमागे मोठया भावाप्रमाणे उभे आहेत. त्यामुळे तुम्ही धीर न सोडता परिस्थितीला सामोरे जावे, ज्या ठिकाणी तुम्हाला गरज वाटेल त्याठिकाणी तुम्ही आम्हाला हाक द्या, शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. विधवा शेतकरी महिलांना सध्या तुटपुंजी ६०० रुपये पेंशन दिले जाते. या पेंशनमध्ये वाढ करण्यासाठी सुरू असलेल्या अधिवेशनात आवाज उठवणार आल्याचेही गोऱ्हे यांनी सांगितले. शेतकरी आत्महत्याग्रस्त महिलांना राज्यातील तसेच केंद्रीय दुष्काळ निवारण समित्यांमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त पिडीत महिलांचा समावेश केल्यास दुष्काळ निवारणाकरिता ठोस उपाययोजना करताना त्यांची स्थानिक पातळीवर मदत होईल, असे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले, जेणेकरुन राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पिडीत महिलांना अधिकार मिळेल. त्याचबरोबर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना शेतजमीन किंवा इतर जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. या अशा समस्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण’ यांच्याकडे मागणी करणार असल्याचेही गोऱ्हे यांनी सांगितले.

हेही वाचा – शिवसेना आमदार तुकाराम कातेंच्या हल्लेखोरांना अटक

- Advertisement -

महिलांनी मांडल्या व्यथा

अनेकदा महिलांना झाळ्यात अडकवून त्यांचे शोषण केले जाते. अशा पीडीत महिलांनी पुण्याच्या स्त्री आधार केंद्रात अर्ज केले तर त्यांच्या सुरक्षेसाठी गावात येवून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन गोऱ्हे यांंनी दिले. या आश्वासनानंतर काही महिलांना अश्रू अनावर झाले. भावुक झालेल्या महिलांना गोऱ्हे यांच्यासमोर व्यथा मांडल्या. अनेकदा नातलगही या महिलांचा छळ करीत असल्याचे दिसून येते. याकरिता जिल्हा पातळीवर स्थानिक तक्रार समित्या स्थापन करण्यात आल्या. परंतु त्या समितीच्या बैठका होत नसल्याने एक विशेष मोहिम राबविण्यात यावी अशी सूचना सरकारला करण्यार असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.


हेही वाचा – मराठा आरक्षण: शिवसेना आमदाराचे आत्मक्लेश आंदोलन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -