घरमुंबईठाण्यातील उपेक्षित कलाकार आजही भाड्याच्या खोलीत

ठाण्यातील उपेक्षित कलाकार आजही भाड्याच्या खोलीत

Subscribe

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील चित्र आणि रांगोळीकार नरेश तुकाराम वाणी हे नोकरीनिमित्त ठाण्यात राहतात. त्यांनी खाजगी नोकरी करताना कलेची आवड जोपासली आहे. मात्र हा कलाकार आजही उपेक्षित असून भाड्याच्या खोलीत राहतो. नरेश वाणी यांनी चित्रकलेचे कोणतेही शास्त्रसुद्ध शिक्षण घेतलेले नाही. त्यांच्याकडे ही कला उपजतच आहे. त्यांच्या कुटुंबात त्यांचे काका आणि चुलत बंधू उत्तम कलाकार आहेत. घरची परिस्थितीची बेताची असल्याने नरेश यांना कामानिमित्ताने ठाणे शहरात नोकरीसाठी यावे लागले. नरेश ठाणे कोपरी भागात त्यांच्या लांब मिशांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु ते उत्तम चित्र आणि रांगोळी काढतात हे फार थोडक्या लोकांनाच माहिती आहे.

नरेश पेन्सिल स्केच, ऑईल कलर, अ‍ॅक्रेलिक, फॅब्रिक यांचा वापर करून चित्र काढतात. त्यांनी आतापर्यंत अ‍ॅबस्ट्रॅक्ट, निसर्ग चित्रे, व्यक्ती चित्रे काढली आहेत. त्यांची चित्रे खूपच प्रसिद्ध आहेत. दिवाळीला ते रांगोळ्या काढतात. त्यांनी काढलेल्या बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे, अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित यांच्या रांगोळ्यांना रसिक आणि तज्ज्ञांची दाद मिळाली आहे.

- Advertisement -

नरेश यांना एकच मुलगी असून ती इंजिनियरिंगच्या दुसर्‍या वर्षात शिकते. तिनेही वडिलांची कला लहानपणापासून पाहिली असल्याने,ती अभ्यासातून वेळ मिळाला की कागदावर चित्रे काढण्यात मग्न होते. नरेश घरात एकटे कमावणारे आहेत.संसाराचा गाडा चालवण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. मुलीला चांगले शिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे. पण सध्या तरी हा कलाकार उपेक्षितच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -