घरमुंबईजादूटोण्याच्या संशयावरून पुतण्याने काकाला ठार केले

जादूटोण्याच्या संशयावरून पुतण्याने काकाला ठार केले

Subscribe

याप्रकरणी शीळ डायघर पोलिसांनी शनिवार (दि.१६) दोघांना अटक केली असून त्यात मुख्य आरोपी मृत तरुणाचा पुतण्या आहे.

शीळ डायघरमधील पिंपरी गाव दहिसर ठाकूर पाडा येथे डोंगराचा पायथ्याशी मुंडके नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.जादूटोण्याच्या संशयावरून एका अज्ञात ४५ वर्षीय तरुणाची धारधार शस्त्राने हत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी शीळ डायघर पोलिसांनी शनिवार (दि.१६) दोघांना अटक केली असून त्यात मुख्य आरोपी मृत तरुणाचा पुतण्या आहे.

पुतण्याने ठार केले काकाला

शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी गाव दहिसर येथे राहणारे मयत विष्णू किसन नागरे (४५) याने त्यांचा भाऊ कृष्णा यास दोन वर्षांपूर्वी जादूटोणा करून मारले असा त्याचा पुतण्या अमित यास संशय होता. या संशयातून शुक्रवारी सकाळच्या सुमारास मयत विष्णू याचा पुतण्या आरोपी अमित नागरे (१९) व त्याचा मित्र अमर शर्मा (२२) या दोघांनी मयत विष्णू यास एकांतपणे गाठून दहिसर ठाकूरपाडा येथील दगडखाणीच्या मागे डोंगराच्या पायथ्याशी धारदार शस्त्राने त्याचे शीर व मुंडके वेगळे करून त्याची निर्घृण हत्या केली. यावेळी मृतदेहाचे शीर जंगलात फेकून तेथून फरार झाले होते. डोंगरात शीर नसलेला मृतदेह आढळल्याने या परिसरात खळबळ उडाली होती. शीळ डायघर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) रामचंद्र मोहिते यांनी गुन्ह्याचा यशस्वी तपास करून शनिवारी आरोपी अमित व अमर यास दहिसरमधून अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -