घरमुंबईनेरूळ-उरण दुसर्‍या टप्प्याला मान्सूननंतर सुरुवात

नेरूळ-उरण दुसर्‍या टप्प्याला मान्सूननंतर सुरुवात

Subscribe

१ वर्ष ३ महिन्यांच्या कालावधीत प्रकल्प होणार पूर्ण

नेरुळ ते उरण रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्पाचे काम यशस्वी पार पडल्यानंतर आता लगेचच दुसर्‍या टप्प्याची कामे मध्य रेल्वेने हाती घेतली आहेत. त्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत. या दुसर्‍या टप्प्यातील कामे पूर्ण करण्यासाठी एक वर्ष तीन महिने इतका कालावधी अपेक्षित ठरवण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतरच या प्रकल्पाच्या कामाची सुरुवात करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवरील नेरुळ ते उरणपर्यंतच्या सुमारे २२ किमी अंतराच्या प्रकल्पातील खारकोपरपर्यंतचा पहिला टप्पा यशस्वी होत असतानाच मध्य रेल्वेने त्यापुढील दुसर्‍या टप्प्यातील १५ किमी अंतराचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावसाळ्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. शुक्रवारी या टप्प्यात बांधण्यात येणार्‍या गव्हाण रेल्वे स्थानकावरील ओव्हरब्रिज (आरओबी) आणि अंडरब्रिज (आरयूबी) यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. या उर्वरित टप्प्यातील बहुतेक कामे ही बामणडोंगरी आणि गव्हाण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान होणार आहेत. तसेच पुलाच्या बांधकामानंतर ११ किमी अंतरावर रेल्वेचे रुळ टाकण्यात येणार आहेत. दरम्यान मागवण्यात आलेल्या निविदानुसार आम्ही मान्सूननंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. तसेच दुसर्‍या टप्प्यातील हे १५ किमीचे काम एक वर्ष आणि तीन महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचा आमचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबत रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी, उरण ही कामे देखील त्याचसोबतीने करण्यात येतील.

- Advertisement -

नेरुळ -खारकोप यशानंतर प्रवाशांना दुसर्‍या टप्प्याची प्रतीक्षा
मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेला नवी मुंबईत येण्याचा मार्ग सुलभ असला तरी यापुढील नेरुळ ते उरणपर्यंत स्वतंत्र लोकल मार्गिकेचा प्रकल्प २० वर्षांपासून रखडला होता. या प्रकल्पाबाबत सर्वप्रथम १९९२ मध्ये करार झाला. पण प्रत्यक्ष कामांला १९९७ मध्ये मुहूर्त मिळाला असला तरीही अनेक कारणांमुळे हा प्रकल्प रखडला. हा प्रकल्प रखडत असल्याचे पाहून रेल्वे बोर्डानेही त्यात लक्ष घातले आणि त्यास नव्याने वेग मिळाला आहे. अखेरीस, या संपूर्ण प्रकल्पातील नेरुळ ते खारकोपरपर्यंतचे काम पूर्ण होऊन ४ नोव्हेंबर २०१८ रोजी पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. या पहिल्या टप्प्यात नेरूळ ते खारकोपर दररोज ४० फेर्‍या चालविण्यात येत आहेत. हा टप्पा पूर्णपणे यशस्वी झाला असून प्रवाशांना यापुढील मार्गाची प्रतिक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -