घरमुंबईअखेर उरण रेल्वेला मुहूर्त मिळाला

अखेर उरण रेल्वेला मुहूर्त मिळाला

Subscribe

बहुप्रतिक्षित अशा नेरुळ उरण वरील पहिल्या टप्प्याला अखेर रविवारचा मुहूर्त मिळाला असून रेल्वेमंत्री पियुष गोयल हे पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

नेरुळ ते उरण मार्गावरील पहिल्या टप्प्यातील खरकोपर पर्यंत सुरू होणाऱ्या बहुप्रतिक्षित अशी रेल्वे लवकरच सुरू होणार आहे. बहुप्रतिक्षित अशा या नेरुळ उरण वरील पहिल्या टप्प्याला अखेर रविवारचा मुहूर्त मिळाला असून रेल्वेमंत्री पियुष गोयल हे पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या रेल्वे मार्गाची घोषणा झाल्यापासून येथे उलवे येथे राहण्यात आलेल्या नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. नेरुळ ते खरकोपर मार्गावर रविवारी पहिली ट्रेन धावणार असून १२ नोव्हेंबरपासून नागरिकांच्या सेवेसाठी पाहिल्या टप्प्यातील मार्ग खुला करण्यात येणार आहे.

दिवसातून २ फेऱ्या

उदघाटनाच्या दिवशी ४ फेऱ्या आखण्यात आल्या आहेत. तर १२ पासून नेरुळ-खरकोपर- नेरुळ व सिबीडी बेलापूर-खरकोपर- सिबीडी बेलापूर आशा दोन्ही मार्गांवर २ फेऱ्या दररोज होणार आहेत. तर नेरुळ पासून निघालेली ट्रेन सिवूडस- दारावे, बामणडोंगरी, खारकोपर तसेच सिबीडी बेलापूर येथुन निघालेली ट्रेन बामणडोंगरी, खरकोपर या स्थानकांवर थांबणार आहे.त्यामुळे सध्यातरी काही दिवस सगरसंगम व तरघर म्हणजेच उलवे वासीयांना काहिकाळ अजून कळ सोसावी लागणार आहे. काही आठवड्यांपूर्वी रेल्वे सुरू करण्यासठी चाचणी घेण्यात आली होती. मात्र खरकोपर स्थानकात ट्रेन आल्यावर प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी घासली गेली होती. त्यामुळे काही दुरुस्त्याकरून रविवारचा मुहूर्त साधत बहुप्रतिक्षित अशा नेरुळ उरण रेल्वेच्या खरकोपरपर्यंतच्या पहिल्या टप्पा सुरू होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -