घरमुंबईअॅपद्वारे सापडणार खारफुटीचे चोर

अॅपद्वारे सापडणार खारफुटीचे चोर

Subscribe

सध्या मोठ्या प्रमाणात खारफुटीच्या जंगलात चोरी आणि वृक्षतोड करतात. याला आळा बसावा आणि खारफुटी जंगलांच्या संवर्धन व्हावे याकरता इस्त्रोची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी (आयआयएसटी) ही संस्था एक अॅप तयार करत आहे. या अॅपद्वारे खारफुटीच्या जंगलात झालेली छोटीशी हालचाल देखील लगेच अधिकऱ्यांना कळणार आहे.

मुंबईच्या किनारपट्टीवर असलेल्या खारफुटीची काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेसुमार कत्तल करण्यात येत आहे. मुंबईत वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे खारफुटी उध्वस्त करून त्या ठिकाणी निवारे बनविण्यात येत आहेत. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरातील खारफुटी नष्ट करून त्या जागी झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. तर नवी मुंबई, वाशी या ठिकाणी खारफुटीच्या जंगलात चोरीच्या आणि वृक्षतोडीच्या अनेक घटना देखील वाढल्या आहेत. या घटनांना चाप बसवण्यासाठी इस्त्रोची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी (आयआयएसटी) ही संस्था एक अॅप तयार करत आहे. या अॅपद्वारे खारफुटीच्या जंगलात झालेली छोटीशी हालचाल देखील लगेच अधिकऱ्यांना कळणार आहे.


वाचा – स्मार्ट सिटी प्रोजेक्टसाठी खारफुटीवर कुर्‍हाड

- Advertisement -

खारफुटीचे अॅप होणार लॉंच

गेल्या अनेक दिवसांपासून खारफुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात खारफुटीच्या झाडांची कत्तल करण्यात येत आहे. मात्र आता खारफुटीच्या जंगलात चोरी करणे चांगलेच महागात पडणार आहे. कारण आता असे एक अॅप लॉंच करण्यात येणार आहे की, त्या अॅपद्वारे खारफुटीच्या जंगलात चोरी करणे, वृक्षतोड करणे या हालचाली या अॅपद्वारे कळणार आहेत. हे अॅप आयआयएसटीचे वैज्ञानिक तयार करत आहेत. हे अॅप खारफुटीच्या जंगलांवर उपग्रहाच्या सहाय्याने सतत नजर ठेवून राहणार आहे. या उपग्रहांची चाचणी यशस्वी झाली की हे अॅप तयार करण्यात येणार आहे. हे अॅप काही निवडक अधिकाऱ्यांनाच पाहता येणार आहे. त्यामुळे आता खारफुटीची वृक्षतोड करणाऱ्यांना लगेचच अटक करण्यात येणार आहे. सध्या ही प्रकिया प्रायोगिक तत्वावर असून २०२१ मध्ये हे अॅप लॉंच करण्यात येणार आहे. खारफुटी जंगलांच्या संवर्धनासाठी जेएनपीटी आणि आयआयएसटी संयुक्तपणे काम करत असून या प्रकल्पावर सरकार एकूण ७० लाख रुपये खर्च करणार आहेत.


वाचा – कचर्‍यामुळे खारफुटी धोक्यात

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -