घरमुंबईराष्ट्रवादी काँग्रेसची नवी फळी घराणेशाहीचीच!

राष्ट्रवादी काँग्रेसची नवी फळी घराणेशाहीचीच!

Subscribe

यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही काँग्रेसची कधी नव्हे इतकी वाताहात झालेली पहायला मिळत आहे. ३,४ दशकापासून पिढ्यानपिढ्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन चालणारे नेते काही क्षणात पक्ष सोडून कुणी भाजप तर कुणी शिवसेनेत गेले. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांना नवीन उमेदवार शोधण्याची वेळ आली. या पक्षांना कोणते उमेदवार मिळणार अशी उत्सूकता लागली असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीड जिल्ह्यात ५ उमेदवारांची घोषणा केली, ज्यात पवारांना पुन्हा घराणेशाहीलाच पुढे आणावे लागले. याही परिस्थितीत तळागळातील कार्यकर्त्याला संधी न देता पवारांनी घराणेशाहीचा पुरस्कार केला.

शरद पवार यांनी घोषित केलेल्या पाच उमेदवारांपैकी चार उमेदवार तरुण आहेत. यामध्ये धनंजय मुंडे, विजयराजे पंडित, संदीप क्षीरसागर आणि नमिता मुंदडा यांचा समावेश आहे. मात्र यांची निवड करताना पवारांनी पुन्हा एकदा घराणेशाही जपण्याचा प्रयत्न केला आहे. परळीतून धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली, धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांचा वारसा लाभला असला तरी त्यांनी राजकारणात आपली जागा निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. विजयसिंह पंडित यांचे वडील आणि बंधु राजकारणात सक्रिय आहेत. अमरसिंह पंडित तर विधान परिषदेवर आमदार आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय पाश्वर्र्भूमी लाभलेली आहे. तर संदीप क्षीरसागर हे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आहेत. तर नमिता मुंदडा या दिवंगत माजी मंत्री विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. बीडमध्ये उमेदवारी जाहीर झालेल्या चारही उमेदवारांना कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने तरुणांना संधी दिली असली तरी घराणेशाही सोडली नसल्याचे स्पष्ट होते.

- Advertisement -

सध्या पवार राज्यभर दौरा करत आहेत, कार्यकर्त्यांमध्ये मिसळत आहेत, त्यांच्याशी हितगुज करत आहेत, त्यांचे मनोबल वाढवत आहेत. गेले त्यांचा विचार करू नका, नव्यांचे स्वागत करा, असे सांगत कार्यकर्त्यांकडे हात करत आता तुमच्यामधून उमेदवार उभा करू, असे म्हणतात, मात्र प्रत्यक्ष उमेदवारी तळागळातील कार्यकर्त्याऐवजी राजकीय घराणेशाही लाभलेल्या तरुणांना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -