घरमुंबईसार्वजनिक क्षेत्रातील ३ बँकांसाठी नव्या अध्यक्षांची नेमणूक

सार्वजनिक क्षेत्रातील ३ बँकांसाठी नव्या अध्यक्षांची नेमणूक

Subscribe

 

नरेंद्र मोदी सरकारने गुरुवारी तीन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी अध्यक्षांची नेमणूक केली. सरकारी क्षेत्रातील बॅंकांचे अध्यक्ष म्हणून विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचा सरकार प्रयोग करत आहे. देना बॅंक, पंजाब अॅन्ड सिंद बॅंक आणि सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया या तिन्ही बॅंकांकरिता अनुक्रमे अंजली बन्सल, चरण सिंह आणि तपन रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे तिन्ही अध्यक्ष नॉन – बँकिंग क्षेत्रातील आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या चांगल्या कामकाजासाठी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांमधील जबाबदारी वाटून देण्याच्या दिशेने हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी गुरुवारी नव्या नियुक्तींची घोषणा करताना सांगितलं.

- Advertisement -

बॅंकांची परिस्थिती चांगल्या स्थितीत नाही

या तिन्ही बॅंकाची स्थिती सध्या तितकीशी चांगली नाही. उदाहरणार्थ देना बँकेला नुकतेच रिझर्व्ह बॅंकेकडून नव्याने कर्ज फेडण्यास सांगितलं आहे. मार्च २०१८ पर्यंत बँकेने एकूण नॉन-परफॉर्मिंग अॅसेट रेशो २२ टक्के नोंदवला आहे. तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा कर्ज रेशोदेखील २१ टक्क्यांहून कमी आहे. पंजाब अँड सिंद बॅंक सध्या ११ टक्क्यांच्या कर्ज रेशोसह बऱ्यापैकी स्थितीमध्ये आहे.

- Advertisement -

कोण आहेत नवे अध्यक्ष

देना बॅंक – अंजली बन्सल
⦁ माजी जागतिक भागीदार आणि व्यवस्थापकीय संचालक, टीपीजी प्रायव्हेट इक्विटी
⦁ धोरण सल्लागार, मॅक्नन्सी अॅन्ड कंपनी
⦁ संस्थापक, स्पेन्सर स्टुअर्ट्स इंडिया

पंजाब अॅन्ड सिंध बॅंक – चरण सिंह
⦁ आरबीआयचे प्राध्यापक, आयआयएम बंगलोर
⦁ माजी वरीष्ठ अर्थतज्ज्ञ, आयएमएफ
⦁ माजी संचालक, आरबीआय

सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया – तपन रे
⦁ माजी सचिव, कंपनी मंत्रालय
कुमार भानू प्रताप शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील बँकेच्या मंडळाच्या सूचनेवर आधारित या नियुक्ती करण्यात आल्याचे राजीव कुमार यांनी ट्विट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -