घरमुंबईसीएसएमटी स्थानक 'पर्यावरणस्नेही' म्हणून ओळखले जाणार

सीएसएमटी स्थानक ‘पर्यावरणस्नेही’ म्हणून ओळखले जाणार

Subscribe

मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक हे आता 'पर्यावरणस्नेही' स्थानक म्हणून ओळखले जाणार आहे.

मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक हे आता पर्यावरणस्नेहीस्थानक म्हणून ओळखले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल बारा पर्यावरणविषयक कसोट्यांवर पात्र ठरल्याने सीएसएमटी स्थानकाला आयएसओ १४००१ : २०१५या प्रमाणपत्राने गौरविण्यात आले आहे. त्यामुळे जागतिक वारसा यादीत समावेश असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकाला आता एक नवी ओळख मिळणार आहे. एखाद्या सेवेची गुणवत्ता तपासण्यासाठी आयएसओ अर्थात इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशनमानांकन घेतले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकनाची गरज लक्षात घेता, १२० देशांनी एकत्र येऊन हे प्रमाण निश्चित केलेले आहे.

यामुळे मिळतो पर्यावरण पूरक स्थानकाचा किताब

रेल्वे स्थानकांला पर्यावरण पूरक स्थानकाचा किताब मिळवण्यासाठी एकूण जागेपैकी ३० टक्के जागांवर उद्यान उभारणे अत्यावश्यक असते. त्याचप्रमाणे सीएसएमटी मुख्यालयासमोर आणि लांबपल्ल्याच्या प्लॅटफॉर्मवर उद्यानांची उभारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर या स्थानकावर स्वच्छता देखील तितकीच ठेवण्यात आली असून याठिकाणी सुका आणि ओला कचऱ्याचे देखील व्यवस्थितरित्या विलीनीकरण केले जाते. त्यासोबतच वीज बचतीसाठी मोठे पंखे कार्यान्वित करण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वेच्या अधिकृत अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisement -

यासाठी देण्यात आले आयएसओचे प्रमाणपत्र

स्वच्छता, वृक्षलागवड, वीज बचत, ओला व सुका कचरा यांचे व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा वापर, तिकिट आणि अन्य सुविधा अशा एकूण १२ विभागांतील नियमांची पूर्तता केल्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्थेकडून आयएसओचे प्रमाणपत्र देण्यात येते. या प्रमाणपत्राचे मानकरी पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रलहे स्थानक ठरले असून या प्रमाणपत्राने या स्थानकाला ऑगस्ट महिन्यात गौरविण्यात आले आहे.

‘सेल्फ टिकिटींग झोन’

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी स्थानकावर सेल्फ तिकीट झोन‘ सुविधा सुरु करण्यात आली आहेविशेष म्हणजे या सेल्फ टिकिटींग झोनमध्ये एकाच वेळी अनेक पर्यायांनी तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहेआतापर्यंत प्रवासी तिकीट काढण्यासाठी एटीव्हीएमजीटीबीएस आणि मोबाईल स्कॅन करुन तिकीट काढण्याचा मार्ग निवडायचेमात्रया तिनही सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांना याचा त्रास व्हायचापरंतुआता प्रवासी एकाच ठिकाणी या तिनही पर्याचा वापर करु शकतातप्रवाशांना एकाच ठिकाणी तिकीट उपलब्ध व्हावी यासाठी सीएसएमटी स्थानकावर सेल्फ टिकिटींग झोनची सुविधा सुरु केली आहेया स्थानकावर एकूण ४ एटीव्हीएम मशीन बसविण्याच आल्या असून प्रवासी कार्डद्वारे तिकिट खरेदी करु शकतात.

- Advertisement -

हेही वाचा – आता सीएसएमटी स्थानकावर उभारले ‘सेल्फ टिकिटींग झोन’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -