घरमुंबईनवी कोरी मेमू रेल्वेच्या कारशेडमध्ये

नवी कोरी मेमू रेल्वेच्या कारशेडमध्ये

Subscribe

मुंबई-पुणे-नाशिक मार्गावर धावणार,येत्या आठवड्यात होणार चाचण्या

वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर बनविलेली पहिली मेमू गाडी मध्य रेल्वेच्या कळवा कारशेडमध्ये नुकतीच दाखल झाली आहे. या गाडीच्या चाचण्या घाट सेक्शनमध्ये येत्या आठवड्यात घेण्यात येणार आहेत. चाचण्या यशस्वी झाल्या तर मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे-नाशिक मार्गावर मेमू धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

चेन्नईतील रेल्वेच्या आयसीएफ फॅक्टरीतून ही गाडी आलेली आहे. ही गाडी उत्तर रेल्वेची असली तरी त्याच्या चाचण्या मध्य रेल्वेच्या अखत्यारितील घाट सेक्शनमध्ये घेण्यात येणार आहेत. त्यानंतर ती ट्रेन दिल्लीला रवाना करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. मेमूच्या चाचण्या यशस्वी झाल्या तर मध्य रेल्वेचा देखील मेमू मिळणार असल्याचे उदासी यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

अशी असेल गाडीची रचना

मेमूला 18 डब्बे असतील. मेमूच्या खालच्या भागात इलेक्ट्रिक यंत्रणा, प्रति तास 130 किमीचा वेग,टॉक बॅक यंत्रणा, स्टेनलेस स्टीलची बॉडी,अद्ययावत सीट, प्रवासी डब्यात दोन शौचालये तर ड्रायव्हरच्या मोटर कोचमध्ये एक शौचालय,सामान ठेवण्यासाठी अ‍ॅल्युमिनीअमचे रॅक, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवाशांसाठी उद्घोषणा यंत्रणा आणि जीपीएस यंत्रणा सुद्धा आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -